Join us

टूथपेस्ट करते कमोड मिनिटभरात स्वच्छ! पिवळे डाग, दुर्गंधी होईल दूर - खिशाला परवडेल असा देसी जुगाड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2025 10:00 IST

1 / 8
दिवसभरात अनेकवेळा वापरल्या जाणाऱ्या कमोडवर पिवळे हट्टी डाग पडणे आणि दुर्गंधी येणे ही एक कॉमन समस्या आहे. हे डाग वेळोवेळी स्वच्छ करणे हे एक मोठे आणि कंटाळवाणे काम वाटते, कारण हे डाग काहीवेळा क्लिनर्सने देखील सहजासहजी निघत नाहीत(how to clean commode with toothpaste).
2 / 8
परंतु आपण फारशी मेहेनत न घेता आणि अगदी कमी खर्चात टूथपेस्टच्या मदतीने कमोड (New Trick to Brighten Commode with Toothpaste) नव्यासारखा स्वच्छ करु शकता. दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी टूथपेस्टच आता तुमच्या बाथरूममधील कमोडला स्वच्छ आणि चकचकीत करु शकते. टूथपेस्टच्या मदतीने कमोड स्वच्छ करण्याच्या हा देसी जुगाड नक्की करुन पाहा...
3 / 8
सोशल मिडियावर सध्या एक अनोखा जुगाड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, अनेकजण कमोडची स्वच्छता करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करत आहेत. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण जे लोक ही ट्रिक वापरत आहेत, ते याला खूपच उपयोगी असल्याचे सांगत आहेत.
4 / 8
सर्वातआधी कोलगेट टूथपेस्टची ट्यूब घ्या आणि सेफ्टी पिनच्या मदतीने त्या ट्यूबवर लहान छिद्रे करुन घ्यावीत. त्यानंतर ती ट्यूब हलक्या हाताने दाबून त्या छिद्रांमधून थोडीशी टूथपेस्ट बाहेर येऊ द्यावी. यानंतर, ती टूथपेस्टची ट्यूब थेट टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये टाकावी.
5 / 8
या टूथपेस्टच्या छिद्रांतून थोडी - थोडी टूथपेस्ट बाहेर येईल आणि फ्लश टँकच्या पाण्यांत मिसळेल आणि प्रत्येक फ्लॅशबरोबर तुमचे कमोड स्वच्छ करेल.
6 / 8
बहुतेक टूथपेस्टमध्ये सौम्य डिटर्जंट आणि क्लिनिंग एजंटचे घटक असतात. फ्लश टँकमध्ये टाकलेली ट्यूब जेव्हा पाण्यात भिजते, तेव्हा प्रत्येक वेळी फ्लश केल्यावर हे घटक पाण्यात मिसळून कमोडमध्ये येतात आणि डाग कमी करण्यास मदत करतात.
7 / 8
टूथपेस्टमध्ये साधारणपणे पुदिना किंवा इतर सुगंधित तेलं असतात. हे सुगंधित घटक पाण्याच्या माध्यमातून कमोडमध्ये पसरतात, ज्यामुळे टॉयलेटमधील दुर्गंधी कमी होते आणि एक मंद, फ्रेश सुगंध दरवळतो.
8 / 8
टूथपेस्टमध्ये असलेले काही घटक जिवाणू आणि जंतूंना वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात. यामुळे कमोडच्या पृष्ठभागावर जंतूंची वाढ कमी होते आणि स्वच्छता अधिक काळ टिकून राहते.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी