रोजच्या वापरातला कुकर तळाशी काळाकुट्ट झाला? ३ उपाय- कुकर स्वच्छ नव्यासारखा चमकेल
Updated:July 15, 2025 15:35 IST2025-07-14T20:33:25+5:302025-07-15T15:35:51+5:30

भात- वरणाचा कुकर काही घरांमध्ये रोजच लावला जातो. त्यामुळे बऱ्याचदा मग रोजच्या वापरातलं कुकर तळाशी काळं पडतं.
ते वेळीच स्वच्छ केलं नाही तर त्याचा काळेपणा वाढत जातो. ते स्वच्छ करण्यासाठी मग जास्त मेहनत आणि वेळ लागतो. हे काही उपाय नियमितपणे केल्यास कुकर व्यवस्थित स्वच्छ होऊ शकतं.
रोज कुकर लावताना जर कुकरच्या तळाशी एक लिंबाची फोड टाकली तर कुकर काळं होत नाही.
कुकरचा काळेपणा कमी करण्यासाठी कुकरच्या तळाशी थोडा बेकिंग सोडा घाला. त्यानंतर त्यावर थोडं लिंबू पिळा. गरम पाणी घालून ते घासणीने घासून काढा. कुकरचा तळ स्वच्छ होईल.
कुकरमध्ये थोडं पाणी घ्या आणि ते गॅसवर गरम करायला ठेवा. गरम पाण्यात थोडं चिंचेचं पाणी आणि थोडं डिशवॉश लिक्विड टाका. यानंतर घासणीने ते घासून घ्या. कुकरचा तळ स्वच्छ होईल.