जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

Updated:January 17, 2026 17:59 IST2026-01-16T15:52:38+5:302026-01-17T17:59:51+5:30

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

एखादा पदार्थ करपल्यामुळे भांडं तळाशी काळं झालं असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.(how to clean burnt kadhai?)

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

स्वयंपाक करताना बऱ्याचदा असं होतं की गडबडीत एखादा पदार्थ करायला आपण कढई, पातेले गॅसवर ठेवतो. पण नंतर मात्र गॅस बंद करायचं पार विसरून जातो.(simple kitchen tips to clean burnt kadhai)

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

त्यामुळे मग भांड्यातला पदार्थ सगळा करपून जातो आणि त्यामुळे मग ते भांडं तळाशी अगदी काळपट होऊन जातं.(easy cleaning tips for burnt kadhai)

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

हे भांडं स्वच्छ करताना अक्षरश: नाकी नऊ येतात. कारण कितीही जोर देऊन घासलं तरी भांड्याचा काळेपणा कमी होत नाही. अशावेळी पुढे सांगितलेला एक साेपा उपाय करून पाहा.

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

हा उपाय करण्यासाठी जळालेल्या भांड्यामध्ये पाणी घाला. त्यामध्ये २ चमचे साखर घाला.

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

त्यातच बेकिंग सोडा, एका लिंबाचा रस आणि १ चमचा डिशवॉश लिक्विड घालून ते भांडे गॅसवर गरम करायला ठेवा. ७ ते ८ मिनिटे त्यातलं पाणी उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा.

जळालेली काळीकुट्ट स्टीलची कढई स्वच्छ चकचकीत करण्याचा १ उपाय- न घासता कढई चमकेल

भांड्यातलं पाणी कोमट झाल्यानंतर ते फेकून द्या. भांड्याच्या तळाशी जमा झालेला काळेपणा सगळा निघून गेलेला असेल. यानंतर अगदी अलगद घासून तुम्ही ते भांडं पुन्हा नव्यासारखं चकाचक करू शकता.