Join us

काही क्षणात स्वच्छ होतील पितळेची भांडी, ५ सोप्या ट्रिक्स, मिनिटांत चमकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2025 17:35 IST

1 / 7
पूर्वी आपल्या स्वयंपाकघरात तांब्या-पितळेची भांडी सहज पाहायला मिळायची. पण ही भांडी घासताना अवघड असायची यामुळे कालातंराने ती वापरणे बंद झालं. (Clean brass utensils)
2 / 7
परंतु, सध्या पितळेची भांडी वापरण्याचा कल महिलांमध्ये वाढला आहे. यामध्ये पदार्थ बनवल्यानंतर ती भांडी घासणे ही देखील महत्त्वाचे असते. वेळीच भांडी नीट घासली नाही तर त्यावर तेलाचे किंवा काळे डाग तसेच राहतात. (Brass cleaning tips)
3 / 7
आपल्याला देवघरात पितळेचे दिवे, समई किंवा इतर भांडी असतात ज्यावर काळे मेणचट थर पसरतात. जर आपल्याकडेही पितळेची भांडी असतील तर या सोप्या ट्रिक्सने साफ करा.
4 / 7
लिंबू आणि मीठ मिक्स करुन पितळेच्या भांड्यांवर घासा. १५ ते २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. स्वच्छ कपड्याने पुसा. भांडे चमकण्यास मदत होईल.
5 / 7
पितळेची भांडी घासताना व्हिनेगर, पीठ आणि मीठाची पेस्ट तयार करा. ही पेस्ट भांड्यांवर लावून ठेवा. त्यानंतर स्क्रबरने स्वच्छ घासा.
6 / 7
टोमॅटो केचप पितळेच्या भांड्यावर घासून काही मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. भांड्यांवरील डाग हलके होण्यास मदत होतील.
7 / 7
बेकिंग सोडा आणि लिंबाच्या पेस्ट तयार करुन पितळेची भांडी घासता येतील. स्क्रबने किंवा ब्रशच्या मदतीने घासा. भांडी नव्यासारखी चमकतील.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स