मीठाशिवाय जेवणाला चव नाहीच, पण पाहा मिठाचे ८ अजून जादूई उपयोग-आजवर नसतील माहिती...
Updated:January 9, 2026 19:00 IST2026-01-09T18:48:25+5:302026-01-09T19:00:10+5:30
how salt removes stubborn stains : salt for stain removal home remedy : remove tough stains using salt : इस्त्रीपासून कप-बशीपर्यंत, मिठाच्या मदतीने घालवा काळेकुट्ट डाग; गृहिणींसाठी अत्यंत फायदेशीर उपाय...

मिठाचा वापर आपण रोजच्या स्वयंपाकात पदार्थांना चव आणण्यासाठी करतो, पण हेच साधेसुदे मीठ घरकामात किती उपयोगी ठरू शकते, याची कल्पना देखील (how salt removes stubborn stains) आपल्याला नसते. घरातील भांडी, कपडे, किचनमधील हट्टी डाग, दुर्गंधी किंवा गंज अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी मीठ अतिशय उपयुक्त ठरते.
महागड्या क्लीनर्सचा वापर न करता आपण मिठाच्या मदतीने घरातील (salt for stain removal home remedy) इतर वस्तूंवरील हट्टी डाग आणि इतर अनेक वस्तू अगदी सहज स्वच्छ करू शकतो. पदार्थांची चव वाढवण्याशिवाय मिठाचे (remove tough stains using salt) असे काही भन्नाट घरगुती उपाय आहेत, जे तुमचे काम सोपे करतील आणि पैशांचीही बचतही करतील...
१. जळकी कढई, पॅन स्वच्छ करण्यासाठी :-
मिठाच्या मदतीने आपण जळलेले पॅन किंवा कढई अगदी सहजपणे स्वच्छ करू शकता. जळलेल्या पॅनवर किंवा कढईवर पुरेसे मीठ घाला. आता लिंबाचा एक तुकडा घेऊन मिठाच्या साहाय्याने जळलेला भाग जोरात घासा. मीठ नैसर्गिक घर्षण निर्माण करते, तर लिंबातील आम्लीय गुणधर्म साचलेली घाण किंवा जळका चिकट थर सैल करण्यास मदत करतात. यामुळे जास्त मेहनत न घेता जळलेली भांडी पुन्हा नव्यासारखी चमकू लागतात.
२. इस्त्रीची प्लेट स्वच्छ करण्यासाठी :-
दररोज इस्त्री वापरुन त्यावर जळलेले कापड, मळ किंवा चिकट डाग जमा होतात. यामुळे इस्त्री खराब तर दिसतेच, पण इस्त्री करताना महागडे कपडेही खराब होण्याची भीती असते. हे डाग घालवण्यासाठी मीठ हा अत्यंत सोपा आणि असरदार उपाय आहे. सर्वात आधी इस्त्री थोडी गरम करून घ्या आणि त्यानंतर तिचा स्विच बंद करा. इस्त्रीच्या गरम प्लेटवर थोडे मीठ शिंपडा. आता एका जाड कपड्याने किंवा स्वच्छ रुमालाने इस्त्रीची प्लेट हलक्या हाताने घासा. काही मिनिटांतच प्लेटवर जमा झालेली सगळी घाण निघून जाईल आणि इस्त्री पुन्हा नव्यासारखी गुळगुळीत आणि स्वच्छ होईल.
३. तांब्या-पितळेच्या भांड्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी :-
तांब्या - पितळेची भांडी काही काळानंतर काळवंडतात आणि त्यांची नैसर्गिक चमक कमी होऊन ती जुनी दिसू लागतात. अशा वेळी ती नव्यासारखी चमकवण्यासाठी मीठ आणि व्हिनेगरचे मिश्रण हा सर्वात सोपा उपाय आहे. थोडं मीठ घ्या आणि त्यात व्हिनेगर मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट पितळेच्या भांड्यांवर सगळीकडे लावा आणि हलक्या हाताने चोळा. थोडा वेळ घासल्यानंतर भांडी स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हे मिश्रण भांड्यांवर जमा झालेला ऑक्सिडेशनचा काळा थर काढून टाकते आणि पितळेच्या भांड्यांना पुन्हा एकदा सोन्यासारखी चमक मिळवून देते. हा उपाय अत्यंत सोपा आणि परिणामकारक असून यामुळे तुमची जुनी भांडीही दीर्घकाळ चमकत राहतात.
४. स्वयंपाक करताना उडणारे तेलाचे थेंब रोखण्यासाठी :-
स्वयंपाक करताना कढईतून किंवा पॅनमधून गरम तेलाचे थेंब उडणे ही एक कॉमन समस्या आहे. यामुळे केवळ गॅस शेगडी आणि आजूबाजूची जागाच घाण होत नाही, तर कधीकधी हाताला चटके बसण्याचीही भीती असते. पॅनमध्ये फोडणी किंवा पदार्थ टाकण्यापूर्वी तेलात किंवा पॅनच्या कडांवर अगदी थोडे मीठ शिंपडा. मीठ तेलातील अतिरिक्त ओलावा (Moisture) शोषून घेते, ज्यामुळे तेल तडतडत नाही आणि त्याचे थेंब बाहेर उडण्याचे प्रमाण कमी होते. या छोट्याशा उपायामुळे तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ राहतेच, शिवाय चटके बसण्याचा किंवा भाजण्याचा धोकाही कमी होतो.
५. चहा-कॉफीचे हट्टी डाग काढण्यासाठी :-
अनेकदा चहा किंवा कॉफी प्यायल्यानंतर कप आणि मगमध्ये पांढरट किंवा पिवळसर डाग पडतात. ज्या ठिकाणी डाग पडले आहेत, तिथे थोडे मीठ शिंपडा. आता एका ओल्या स्पंजने किंवा कपड्याने डाग असलेल्या जागी हलक्या हाताने चोळा. मिठाच्या नैसर्गिक घर्षणामुळे कपमधील डाग लगेच कमी होतात. काहीवेळ घासल्यानंतर कप पाण्याने धुवून टाका, तुमचा मग पुन्हा एकदा नव्यासारखा स्वच्छ आणि चमकदार दिसेल.
६. किचनमधील तेलकट डाग दूर करण्यासाठी :-
गॅस, टाइल्स किंवा स्लॅबवर साचलेले तेलकट डाग काढण्यासाठी मीठ थोडे पसरवून त्यावर गरम पाणी टाकावे. डाग पटकन निघतात.
७. सिंक आणि चॉपिंग बोर्डची स्वच्छता :-
किचनमधील सिंकमध्ये चिकटपणा किंवा दुर्गंधी येत असेल, तर गरम पाण्यात मीठ टाकून ते सिंकमध्ये ओता. तसेच, लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी त्यावर मीठ आणि लिंबू घासल्यास त्यावरील जंतू मरतात आणि बोर्ड स्वच्छ होतो.
८. हाताला लागलेला कांदा-लसूणचा वास काढण्यासाठी :-
हाताला लागलेला कांदा-लसूणचा किंवा इतर मसाल्यांचा किंवा भाज्यांचा वास काढण्यासाठी हातांवर मीठ चोळून पाण्याने धुवा.