Join us   

हरितालिकेचा उपवास असताना करु नका ५ गोष्टी, नाहीतर उपवास करण्याचा उपयोग शून्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 4:17 PM

1 / 9
हरितालिका आणि गणेशोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे. हरितालिकेचे व्रत महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून करतात. शिव पार्वतीची उपासना करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. (Hartalika Teej 2022)
2 / 9
ज्यांना हे व्रत करायचे त्या सर्वजणी हे व्रत करु शकतात. यात कुठलाही धार्मिक भेदभाव नाही.
3 / 9
कुठलाही उपवास ही श्रद्धेनं करायची गोष्ट असते. श्रद्धा असेल तर उपवास, पूजाअर्चा यांनी मनाला समाधान लाभते. या व्रताचेही तेच आहे. अनेकजणी एकत्र येत आनंदानं हे व्रत रात्री जागरण करतात.
4 / 9
महिलांनी एकत्र येणं, आनंदानं एकत्र मनातल्या गोष्टी बोलणं. त्यानिमित्तं भेटी होणं, गप्पा होणं हादेखील या व्रताचा भाग आहे.
5 / 9
१) उपवासाचा एक अर्थ म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ईश्वराला शरण जाणे. म्हणून उपवास करताना केवळ उपाशी राहणं महत्त्वाचं नाही तर आपल्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवणं, हे ही व्रताचाच भाग म्हणायला हवे.
6 / 9
२)सर्वांशी प्रेमानं बोलावं. आपण आनंदात आहोत ना, आपला आपल्याशी संवाद आहे ना हे ही पाहणं महत्त्वाचं. आपल्या आनंदाची आपण काळजी घ्यावी.
7 / 9
३) मनात द्वेष किंवा तिरस्काराची भावना असेल तर त्याचा निचरा यानिमित्तानं व्हावा. माफ करावं इतरांना आणि स्वत:ला. मनावरचं ओझं बाजूला ठेवावं.
8 / 9
४) उपवासाच्या दिवशी कुणाचाही अनादर करु नये. अपमान करू नये. कारण त्यानं आपल्या मनालाही त्रास होतो. आपण प्रसन्न राहणं महत्त्वाचं.
9 / 9
५) आपण आपली काळजी घेणं, आपल्याला जे जमत नाही त्याचा विचार करुन, जे करावंसं वाटतं ते मनापासून करावं.
टॅग्स : सोशल व्हायरलगणेशोत्सवगणेशोत्सव विधी