साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

Published:January 3, 2022 04:31 PM2022-01-03T16:31:52+5:302022-01-03T16:42:29+5:30

साडीच आहे विद्याचे स्टाईल स्टेटमेंट; साड्यांचे जबरदस्त कलेक्शन...

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कायम नवनवीन लूक करत स्वत:ला लाईमलाईटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये कधी वेस्टर्न तर कधी ट्रॅडीशनल लूक करत त्या आपले वेगळेपण जपत असतात. पण विद्या बालन मात्र याला अपवाद आहे असे म्हणावे लागेल.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

नुकतेच ४३ व्या वर्षात पदार्पण करणारी विद्या बालन आपल्याला नेहमी साडीत पाहायला मिळते. साडीवर तिचे विशेष प्रेम असून ती कोणत्याही प्रकारच्या साड्यांमध्ये तेवढीच खुलून दिसते.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

साडी ही विद्याची स्टाईल झाली असून तिच्याकडे साड्यांचे खूप मोठे कलेक्शन आहे. यामध्ये भारतातील विविध प्रांतातील पारंपरिक साड्यांबरोबरच वेस्टर्न लूक देणाऱ्या महागड्या साड्यांचाही समावेश आहे. तिच्यावर कोणताही रंग आणि प्रिंट खुलून येत असल्याचे आपल्याला तिच्या फोटोंतून दिसते

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

विद्या वर्षाला ३०० हून जास्त साड्या खरेदी करते. विशेष म्हणजे एकदा नेसलेली साडी ती पुन्हा नेसत नाही. मग इतक्या साड्यांचे ती काय करते असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर या साड्या विद्या आपले नातेवाईक आणि नोकर मंडळींना वाटून टाकते.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

ट्रेंड आणि फॅशनचा विचार न करता आपल्याला जे आवडेल, जे रुचेल तेच आपण करायला हवे असे विद्याचे म्हणणे आहे. कोणी करते म्हणून एखाद्या फॅशनच्या मागे धावण्यापेक्षा स्वत:ची हटके स्टाईल आपण निर्माण करायला हवी. तुमची स्टाईलच फॅशन बनेल अशी स्टाईल हवी आणि त्यातच खरी मजा आहे असेही ती म्हणते.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती आपले साडीतील वेगवेगळे फोटो शेअर करत असते. कोणता अॅवॉर्ड शो असो नाहीतर एखादी पार्टी विद्या सगळीकडे कधी पारंपरिक तर कधी हटके अशा आगळ्यावेगळ्या साड्या नेसते. त्याठिकाणची तिची उपस्थिती आजुबाजूच्यांचे लक्ष वेधून न घेईल तरच नवल.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

याचा अर्थ विद्याला वेस्टर्न कपडे आवडत नाहीत किंवा त्यात ती चांगली दिसत नाही असे नाही. त्या कपड्यांमध्येही विद्या तेवढीच हॉट आणि एलिगंट दिसते. मात्र साडीमध्ये ती जास्त कम्फर्टेबल असल्याने ती साडी नेसणे पसंत करत असल्याचे तिने अनेक मुलाखतींमधून सांगितले आहे.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

‘हम पांच’ या विनोदी टीव्ही मालिकेद्वारे विद्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर 2005मध्ये ‘परिणीता’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात विद्या सैफ अली खानसोबत झळकली होती. विद्याने हिंदी, मल्याळम, तमिळ आणि बंगाली अशा विविध भाषेत अभिनय केला आहे.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

विद्या कोणतीही साडी इतक्या परफेक्ट पद्धतीने कॅरी करते की तिची हेल्दी तब्येत त्यामध्ये सहज झाकली जाईल. ब्लाऊजची निवड करतानाही तब्येत चांगली असल्याने ती शक्यतो लांब बाह्यांचे किंवा पूर्ण बाह्यांचे ब्लाऊज घालणे पसंत करते. त्यामुळे लठ्ठपणा काहीसा लपला जाण्यास मदत होते.

साडी नेसून ग्लॅमरस दिसणाऱ्या विद्या बालनचे घायाळ करणारे कमाल लूक; पाहा हे फोटो

प्रत्येक साडीवर विद्या घालत असलेले मोठे कानातले, हातातील एखादे सुंदर ब्रेसलेट किंवा गळ्यातील नेकलेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो. तिच्या या बोल्ड लूकमध्ये ती कायमच खूप सुंदर दिसत असल्याने तिचे फॅन्स तिच्यावर अक्षरश: फिदा झालेले दिसतात.