1 / 6गणपती स्थापनेच्या पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूंची जुळवाजुळव करून पूजेची थाळी आधीच तयार करून ठेवा. म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही...2 / 6मखर किंवा सजावटीचे सामान, गणपतीचा पाट, चौरंग, त्यावर टाकायचे वस्त्र, लाईटिंग आणि सजावटीच्या इतर माळा असे सगळे सामान आधीच काढून ठेवा. शक्य झालं तरी सगळी आरास करून ठेवा. म्हणजे ऐनवेळी पळापळ होणार नाही.3 / 6कलश, पाणी, विड्याची पानं, सुपारी, एक- दोन रुपयांची नाणी, गुळ, खोबरं, पंचामृत, खडीसाखर, दूध, हळद- कुंकू, गुलाल, अक्षदा, धूप किंवा उदबत्ती, काडेपेटी, पळी, संध्यापात्र, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, दोर वाती, फुल वाती, आरतीचा दिवा, कापूर असं सगळं साहित्य घालून पुजेची थाळी तयार करून ठेवा.4 / 6गणपतीला वाहायला दुर्वा, आघाडा, जास्वंदाची फुलं, वस्त्रमाळा, इतर फुलं, गणपतीला जानवं असं सगळं एका ट्रेमध्ये तयार ठेवा.5 / 6गणेशस्थापनेच्या पुजेमध्ये पंचखाद्य आणि खिरापत यांचा विशेष मान असतो. ती आदल्या दिवशीच तयार करून ठेवा.6 / 6तसेच बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या मोदकाच्या सगळ्या सामानाची जुळवाजुळव करून सगळे साहित्य एका ठिकाणी काढून ठेवा. जेणेकरून दुसऱ्यादिवशी सामानाची शोधाशोध करण्यात वेळ जाणार नाही.