Join us   

प्रचंड कष्ट ते आचरट ड्रामे, राखी सावंतच्या १० गोष्टी, कधी काळी जेवणात वाढपी म्हणून काम करणारी राखी आज..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2023 3:26 PM

1 / 10
बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात राखी सावंत आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती इंटरनेटवर नेहमी चर्चेत असते. तिने सुरुवातीच्या काळात हालाखीचे दिवस काढलेत. तिने आपल्या आयुष्यात अनेक चढ - उतार पाहिलेत. तिला नुकतंच मातृशोक झाले आहे. तिच्या आईचं कर्करोग आणि ब्रेन ट्युमर या गंभीर आजारामुळे निधन झालं आहे.
2 / 10
राखी सावंत यांच्या आईचे नाव माया भेडा होते. ती अनेक दिवस आपल्या आईची सेवा करत होती. २०२१ साली राखीच्या आईवर एक शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी अभिनेता सलमान खान आणि सोहेल खान यांनीच राखीची मदत केली होती. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
3 / 10
सगळ्यांना राखीच्या आई बद्दल तर माहीतच असेल मात्र, तिच्या वडीलंबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. राखी सावंतची आई जया सावंत यांनी दुसरं लग्न आनंद सावंत यांच्याशी केलं होतं.
4 / 10
राखीचे दुसरे वडील मुंबई पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. राखी तिच्या नावापुढे त्यांचच आडनाव लावत असत. २०१२ साली आनंद सावंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आणि आता राखीच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे ती पूर्णतः कोलमडून गेली आहे.
5 / 10
मिडिया रिपोर्टनुसार राकेश सावंत नावाचा राखीचा एक लाहन भाऊ आहे तर, उषा सावंत नावाची एक छोटी बहिण देखील आहे. मात्र, राखीने आजपर्यत यांच्यासंदर्भात कुठेही भाष्य केलं नाही.
6 / 10
राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचे नाव बदलून राखी सावंत ठेवले. सुरुवातीच्या काळात तिने प्रचंड स्ट्रगल केलं आहे. वयाच्या १०व्या वर्षी अवघ्या ५० रुपयांसाठी तिने टीना अंबानी यांच्या लग्नात लोकांना जेवण वाढले होते.
7 / 10
राखीचे कुटुंब खूप गरीब होते. तिच्या कुटुंबाला उदरनिर्वाह करणे देखील खूप कठीण जात होते. कधी कधी असे व्हायचे की, त्यांच्याकडे खायला अन्नही नसायचे. शेजारी त्यांना जेवायला उरलेले अन्न द्यायचे.
8 / 10
फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी राखीने घरातून पैसे चोरले आणि पळून गेली होती. कारण, तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने लवकर लग्न करावे. त्यावेळी तिला अभिनयातलं काहीच कळत नव्हतं. तिने सुरुवातीच्या दिवसात निर्मात्यांसमोर नृत्य सादर केले होते, त्यावेळी तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं गेलं.
9 / 10
तिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात १९९७ साली 'अग्नीचक्र' या चित्रपटातून केलं. मात्र, तिला खरी ओळख 'परदेसीया' या सॉंग अल्बममधून मिळाली. त्यानंतर तिची खरी ओळख आयटम डान्सर म्हणून झाली.
10 / 10
राखीचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले. तिचे नाव गायक मिका सिंगपासून आदिल दुर्रानीसोबत जोडले गेले आहे. तिने नुकतंच आदिल दुर्रानीसोबत लग्नगाठ बांधली. तिचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान, राखी सावंतची नेटवर्थ जवळपास 37 कोटी इतकी आहे. सध्या मुंबईत राखी सावंतचे दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे.
टॅग्स : राखी सावंतराखीबॉलिवूड