Join us

Friendship Day 2025: जीवाभावाच्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं तर काहीतरी खास हवं तिच्यासारखंच! पाहा ५ भन्नाट गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 18:23 IST

1 / 7
एरवी आपण नवरा, बायको, मुलं, मुली, भाऊ, बहिणी, नातेवाईक यांना सतत काही ना काही गिफ्ट देतच असतो. पण मैत्रिणीला कधीच काही आवर्जून देणं होत नाही.
2 / 7
म्हणूनच आता या फ्रेंडशिप डे ला तुमच्या मैत्रिणीला काहीतरी खास गिफ्ट आणून द्या. असं एखादं गिफ्ट जे तिच्या कायम लक्षात राहील आणि ती ते मनापासून एन्जॉय करेल..
3 / 7
फ्रेंडशिप डे तसाही रविवारच असतो. त्यामुळै मैत्रीण आणि तुम्ही असं दोघी मिळूनच कुठेतरी दूर भटकायला जा. छानशा हॉटेलमध्ये जाऊन आवडीचं जेवा, सिनेमा पाहा.. पुर्ण दिवस धमाल करा..
4 / 7
मैत्रिणीची आवड, छंद कोणते आहेत ते ओळखा आणि तिला त्यानुसार एखादं गिफ्ट घेऊन द्या. उदा. गार्डनिंगची हौस असेल तर तिला वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या आणि रोपं आणून द्या. ते तिच्यासाठी छान गिफ्ट असेल.
5 / 7
तुमच्या दोघींचा एखादा छानसा फोटो मैत्रिणीला फ्रेम करून गिफ्ट द्या. तो फोटो जर तुमच्या लहानपणीचा, कॉलेजमधल्या आठवणींचा असेल तर तो पाहून ती आणखी खुश होईल.
6 / 7
कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेताना त्या घरातली महिला मात्र स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्षच करते. त्यामुळे तुम्ही आणि तुमची मैत्रिण अशा दोघी मिळून योगा, जीम, झुंबा असे फिटनेस क्लास जॉईन करा. त्या क्लासचं ॲडमिशन तुम्हीही घ्या आणि तुमच्या मैत्रिणीलाही गिफ्ट म्हणून घेऊन द्या.
7 / 7
घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना बऱ्याचदा आवडीचे छंद जोपासणं राहून जातं. तसं तुमच्या मैत्रिणीच्या बाबतीत काही झालंय का ते पाहा आणि तिला तिच्या आवडीच्या छंद क्लासला ॲडमिशन घेऊन द्या. उदा. गाणं आवडत असेल तर तिचं गाण्याच्या क्लासमध्ये ॲडमिशन करून देणं हे तिच्यासाठी खूप सुखद गिफ्ट असू शकतं.
टॅग्स : सोशल व्हायरलफ्रेंडशिप डेगिफ्ट आयडिया