चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

Updated:June 20, 2025 11:58 IST2025-06-20T11:28:29+5:302025-06-20T11:58:57+5:30

foggy glasses, rainy days, see how to maintain your glasses well, try these tips : चष्मा स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे. पावसाळ्यात चष्म्यावर पाणी पडून भुरकट दिसू नये यासाठी टिप्स.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

चष्मा वापरणारे अनेक जण असतात. चष्मा अगदी कॉमन असे उपकरण आहे. जे नजर चांगली राहावी यासाठी उपयुक्त ठरते. चष्मा लावल्याशिवाय अनेकांना काहीच दिसत नाही.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

डोळ्यांसाठी ज्यांना चष्मा फारच गरजेचा असतो असे लोक कायम चष्मा लावून असतात. कमी नंबर असणारे लोक मधेच चष्मा काढू शकतात. मात्र ज्यांना तो कायम लावावा लागतो अशा लोकांना चष्म्यावर डाग असतील तर काही काम नीट करता येत नाही.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

लहान मुलांच्या हातळण्यामुळे किंवा आपल्याकडूनच कधी काही लागल्यामुळे चष्म्याची काच खराब होते. त्यावर नखाचे ओरखडे उठतात. इतरही गोष्टींमुळे चष्मा खराब होतो. मग डोळ्यासमोर कायम रेषा दिसतात. त्यामुळे पाहण्यास अडथळा निर्माण होतो.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

तोंडाला मास्क लावल्यावर किंवा काही गरम पिताना चष्म्यावर वाफ धरते. गाडीतून प्रवास करताना किंवा श्वासामुळेही चष्म्यावर वाफ धरते. अशा वेळी काही सोपे उपाय करुन चष्म्याची काच साफ ठेवता येते.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

चष्म्यावर दिवसातून दहा वेळा तरी बोट लागते लागते आणि त्यामुळे तो पुसावा लागतो. चष्मा आपण घातलेल्या कपड्यांना पुसतो त्यामुळे तो खराब होतो. चष्मा पुसण्यासाठी वेगळे कॉटनचे फडके ठेवायचे. असे केल्याने चष्म्यावर डाग पडत नाहीत.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

चष्मा वापरायचा नसेल तेव्हा कायम केसमध्येच ठेवायचा. बाहेर ठेवायचा नाही. त्याला काहीही लागले तरी चष्मा खराब होतो. तेलकट, तुपकट हाताने हाताळू नका. स्वच्छ हातच लावा.

चष्म्यावर वाफ धरते-डाग पडतात म्हणून कुठलेही व्हायरल उपाय करत असाल तर सावधान..

चष्मा साफ करण्यासाठी अनेक ट्रिक्स आजकाल व्हायरल होत असतात. हे लावा ते लावा असे सांगणारे व्हिडिओ तुम्हीही पाहीले असतील. पण तसे काही उपाय करायचे नाहीत. चष्मा साफ करण्यासाठी मिळणारे औषध घेऊन या. त्यानेच चष्मा धुवायचा.