Join us

ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींसाठी फुलांच्या हाराचे वेगवेगळे प्रकार- याावर्षी ट्रेंडिंग असणाऱ्या खास डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 18:27 IST

1 / 7
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे आवाहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी महापुजा केली जाते, त्यादिवशी गौरींना फुलांचे छान हार घातले जातात.
2 / 7
अशा नवनविन प्रकारातले कित्येक हार तुम्ही गौरींसाठी आणू शकता.
3 / 7
कुंदन आणि फुलं यांचा सुरेख वापर करून तयार केलेले हे हारही अतिशय देखणे आणि खूप वेगळे वाटतात. गळ्यात एखादा दागिना घालावा त्याप्रमाणे ते उठून दिसतात.
4 / 7
गुलाब आणि शेवंती किंवा पांढरी ॲस्टरची फुलं असं कॉम्बिनेशनही खूप उठून दिसतं.
5 / 7
गुलाबाच्या पाकळ्यांचा असा भरगच्च हारसुद्धा खूप शोभून दिसतो. गौरींचं सौंदर्य अशा पद्धतीच्या हारांनी उठून दिसेल.
6 / 7
लालबुंद गुलाब आणि त्याच्या जोडीला पांढरा किंवा हलकासा गुलाबी गुलाब असं कॉम्बिनेशनही खूप छान दिसतं.
7 / 7
गुलाब, मोगरा, निशिगंध असं कॉम्बिनेशन असणारे असे काही हारसुद्धा तुम्हाला मिळू शकतात. किंवा तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कस्टमाईज करून घेऊ शकता.
टॅग्स : सोशल व्हायरलफुलंगणपती 2025गणपती उत्सव २०२५