Fathers Day २०२५ : 'सिंगल फादर' म्हणून लेकरांना एकट्याने सांभाळणाऱ्या 'बापमाणसाची' गोष्ट...
Updated:June 12, 2025 18:23 IST2025-06-12T18:11:44+5:302025-06-12T18:23:16+5:30
Fathers Day 2025 : Meet single dads of Bollywood : 7 Single Fathers Of Bollywood Who Broke Stereotypes : 7 inspiring single dads of Bollywood : 7 Single Dads Of Bollywood : फादर्स डे निमित्ताने, बॉलिवूडमधील असे काही 'सिंगल फादर्स' आहेत ज्यांनी लेकरांना मोठ्या मायेने वाढवले....

मुलांना वाढवणे, संगोपन करणे ही आई इतकीच वडिलांची ( Fathers Day 2025) देखील जबाबदारी असतेच. परंतु बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध अभिनेत्यांनी मुलांची 'सिंगल फादर' म्हणून जबाबदारी (7 Single Dads Of Bollywood) एकट्याने पार पाडली. साधारणपणे आपल्याकडे पालकत्व म्हटलं की आई आणि वडील अशा दोन व्यक्तींची गरज असते. असे असले तरी विशेषतः सिंगल पॅरेंट म्हणून आपण एकटेच असतो तेव्हा अनेक गोष्टी सांभाळत मुलं वाढवणे ही सोपी गोष्ट नसते.
बाळासाठी आई हवीच, किंवा आईच बाळाचा सांभाळ (Meet single dads of Bollywood) आणि संगोपन करु शकते, अशा पारंपरिक विचारांना छेद देत काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी (7 Single Fathers Of Bollywood Who Broke Stereotypes) एकटे वडील होण्याची भूमिका स्वीकारली. त्यांनी घेतलेल्या या निर्याणयाने समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. या फादर्स डे निमित्ताने, बॉलिवूडमधील असे काही सिंगल फादर्स आहेत ज्यांनी लेकरांना मोठ्या मायेने वाढवले त्या 'बापमाणसाची' गोष्ट...
१. करण जोहर :-
बॉलीवूडचा दिग्गज चित्रपट निर्माता करण जोहर २०१७ मध्ये सरोगसीद्वारे यश आणि रूही या जुळ्या मुलांचा पिता झाला. करण सिंगल फादर म्हणून त्याच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलतो. अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या पॅरेंटिंगच्या वेगवेगळ्या अनुभवांची झलक देखील शेअर करतो.
२. तुषार कपूर :-
तुषार कपूर याने सिंगल फादर होण्यासाठी सरोगसीचा पर्याय निवडला. त्याचा मुलगा लक्ष्यचा जन्म २०१६ मध्ये झाला. तुषार एकट्याने त्याचा सांभाळ करत आहे. तुषारने त्याचे 'बॅचलर डॅड' हे पुस्तक प्रकाशित केले, ज्यामध्ये त्याने त्याच्या सिंगल फादर होण्याचे वेगवेगळे अनुभव शेअर केले आहेत.
३. राहुल देव :-
राहूल देव याने काही चित्रपटांमध्ये काम केले आणि पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भूरळ पाडली. राहुलच्या पत्नीचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर, राहुलने एकट्याने त्याचा मुलगा सिद्धार्थचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली.
४. कमल हसन :-
कमल हसन यांनी १९८८ मध्ये भरतनाट्यम कलाकार वाणी गणपथीसोबत घटस्फोट घेऊन, अभिनेत्री सारिका सोबत लग्न केले. त्यानंतर २००४ साली सारिका सोबत देखील त्यांचा घटस्फोट झाला. दोन घटस्फोटांनंतर, दोन्ही मुली श्रुती आणि अक्षरा यांचा एकट्याने सांभाळ केला.
५. राहुल बोस :-
राहुल बोस यांनी २००७ मध्ये त्यांच्या धर्मादाय संस्थेच्या मदतीने अंदमान आणि निकोबार बेटांवरून ११ वर्षांच्या सहा मुलांना दत्तक घेतले. त्यांच्या दत्तक मुलांची नावे प्रतिमा, रुखसार, मात्रेना, बिंदू, जिनू आणि अनिमेश आहेत. त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी आपल्या एकूण उत्पन्नांतील काही वाटा देऊ केला आहे.
६. चंद्रचूर सिंग :-
२००७ साली जन्म झालेल्या लहानशा शारंजयला वाढवण्यासाठी चंद्रचूर सिंग यांनी आपल्या करिअर मधून ब्रेक घेतला.हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत, चंद्रचूर सांगतो, "माझ्या मुलासोबत राहणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते आणि मला माझ्या निर्णयाचा जराही पश्चात्ताप होत नाही".
७. बोनी कपूर :-
२०१८ साली झालेल्या श्रीदेवींच्या मृत्यूनंतर, बॉलीवूडचे सुप्रसिद्ध निर्माता बोनी कपूर दोन्ही लेकी जान्हवी आणि खुशी यांचा सिंगल फादर म्हणून एकट्याने सांभाळ करत आहेत.