Fact Check : गव्हात पोरकिडे झाले? १ रुपयांचा शॅम्पू वापरा, धान्य चांगले ठेवण्याचा हा उपाय चांगला की...
Updated:March 1, 2026 13:48 IST2026-03-01T13:38:15+5:302026-03-01T13:48:17+5:30
Fact Check : शॅम्पूतील रसायन धान्याच्या दाण्याच्या आत झिरपू शकतात. जी साध्या पाण्यानं किंवा उन्हात वाळवून पू्र्णपणे निघत नाहीत.

चपात्या करण्यासाठी सतत गहू विकत आणण्यापेक्षा बरचेजण वर्षभराचे गहू एकदाच भरून ठेवतात. पण यामुळे गव्हाला पोरकीडे लागण्याची समस्या उद्भवते.(Fact Check Is is Safe To Use Clinic Plus Shampoo For Wheat Bugs)
आजकाल सोशल मीडियावर दावा केला जात आहे की क्लिनिक प्लस या १ रूपयांच्या शॅम्पूचा वापर करून तुम्ही गव्हातील पोरकीडे घालवू शकता. पण ही पद्धत पूर्णपणे सेफ किंवा शिफारस करण्यायोग्य नाही. (Clinic Plus Shampoo For Wheat Bugs)
शॅम्पू हे केस धुण्याासठी बनलेले एक कॉस्मेटीक उत्पादन आहे. ते खाण्याच्या धान्यासाठी बनलेले नाही. शॅम्पूमध्ये सर्फेक्टंटस, सुगंधी द्रव्य आणि इतर रसायनं असतात.
जी धान्याला चिकटून राहू शकतात. अशा धान्यांचा वापर खाण्यासाठी करणं धोकादायक ठरू शकतं. म्हणून धान्य चांगले ठेवण्यासाठी पारंपारीक उपाय करणंच चांगले ठरते.
कडुलिंब आणि लाल तिखट हे पारंपारीक किटकनाशक म्हणून काम करते यामध्ये शॅम्पू मिसळण्याची काही आवश्यकता नाही. शॅम्पू धान्यावर एक थर तयार करतो जो आरोग्यासाठी धोकादायक ठरतो.
शॅम्पूतील रसायनं धान्यांच्या दाण्याच्या आत झिरपू शकतात. जी साध्या पाण्यानं किंवा उन्हात वाळवून पू्र्णपणे निघत नाहीत.
जर तुम्हाला गहू साठवणीसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक पर्याय हवे असतील तर हा उपाय सुरक्षित आहे. कडुलिंबाचा पाला स्वच्छ धुवून मग वाळवून गव्हात मिसळून ठेवा.
धान्याला थोड्या प्रमाणात एरंडेल तेल चोळल्यास किडींचा प्रादुर्भाव होत नाही. गहू स्टिलच्या कोठीत किंवा हवाबंद डब्यात ठेवा.