लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

Updated:August 28, 2025 14:16 IST2025-08-26T16:28:56+5:302025-08-28T14:16:02+5:30

Easy Garlic Peeling Hacks : लसूण पटकन सोलून होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया.

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

रोजच्या कामांची कितीही सवय असली (Genius Hacks To Peeling Garlic) तरी स्वंयपाकघरातील काही कामांचा कंटाळा आल्याशिवाय राहत नाही. तसंच एक काम म्हणजे लसूण सोलणं. लसूण सोलण्याचं किचकट काम कोणालाच आवडत नाही. (Cooking Hacks) त्यामुळे वेळही जातो आणि मेहनतही लागते. लसूण पटकन सोलून होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (Easy Garlic Peeling Hacks)

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या १५ ते २० मिनिटं भिजत ठेवा. यामुळे साल सहज मऊ होऊन निघून जाते.

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

लसणाची पूर्ण पाकळी मायक्रोव्हेव्हमध्ये ठेवा आणि १० ते १५ सेकंदांसाठी गरम करा. यामुळे लसणाची सालं आपोआप निघून जातील.

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

लसणाची पाकळी एका सपाट भागावर ठेवा. त्यानंतर चाकूचा सपाट भाग तळ हातानं हलका दाबा यामुळे सालं लगेच निघून हातात येतील.

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

एक रिकामी पाण्याची बाटली घ्या. त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. बाटली जोरात हलवा. यामुळे लसणाचे साल आपोआप निघेल. कमी वेळात जास्त लसूण सोलण्यासाठी ही युक्त प्रभावी आहे.

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

लसणाच्या पाकळ्या एका भांड्यात घ्या. त्यावर थोडं तेल आणि चिमूटभर मीठ घाला नंतर व्यवस्थित एकत्र करा. तेल आणि मीठामुळे साली मऊ पडतात आणि सहज निघून जातात. या पद्धतीनं लसूण सोलताना हातांना चिकटपणा येत नाही.

लसूण सोलणं किचकट? झटपट सोलून होईल किलोभर लसूण, ५ ट्रिक्स-स्वयंपाकघरातील कामं करतात सोपं

एक जाड हात रूमाल किंवा किचन टॉवेल घ्या. त्यावर लसणाच्या पाकळ्या पसरवा. रूमालाची गाठ बांधून एका सपाट भागावर हलक्या हातानं दाबा. ज्यामुळे साली सैल होतील आणि सोलताना जास्त जोर लावावा लागणार नाही. ही ट्रिक खूपच सोपी आहे आणि कमी वेळात जास्त काम करून देते.