Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

Updated:October 8, 2025 18:00 IST2025-10-08T18:00:00+5:302025-10-08T18:00:01+5:30

diwali home cleaning tips: kitchen cleaning hacks: bathroom tile cleaning tips: काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अवघ्या काही तासात घराची साफसफाई व्यवस्थित होईल.

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

दिवाळीचा सण हा दिव्यांचा, रोषणाईचा आणि गोडधोडाचा. दिवाळी येण्यापूर्वीच आपल्या घरात विविध पदार्थ बनवण्याची रेलचेल सुरु असते. आपण दिवाळीपूर्वी घराची स्वच्छता करतो. घरातील कानाकोपरा स्वच्छ करतो, बेड, उशांचे कव्हर, पडदे सगळं काही बदलतो.(diwali home cleaning tips)

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

दिवाळीची साफसफाई म्हटलं की, अनेकदा नाकीनऊ येतात. घरातील काही कानेकोपरे असे असतात. ज्याकडे वर्षभर दुर्लक्ष केले जाते.पण दिवाळीत आपल्याला संपूर्ण घर नेटनेटके-छान आणि स्वच्छ हवे असते. यावेळी आपल्याला घरच्यांकडून देखील मदत कमी मिळते. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अवघ्या काही तासात घराची साफसफाई व्यवस्थित होईल. (kitchen cleaning hacks)

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

आपल्या घरातील खिडक्या, बाल्कनी किंवा आरसे स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करु शकतो. पाण्यात व्हिनेगर मिसळा. स्प्रेच्या बाटलीत भरा आणि काचेवर स्प्रे करा. काही वेळानंतर मायक्रोफायबर कापडाने पुसून टाका, नव्यासारखे चमकेल.

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

दिवाळीसाठी आपण मायक्रोवेव्ह लिंबूने स्वच्छ करु शकता. त्यासाठी अर्धा लिंबू कापून घ्या, त्याचा रस काढा आणि चार चमचे पाणी घाला. मायक्रोवेव्ह मध्ये १० मिनिटे गरम करा. यामुळे वास आणि डाग निघून जाण्यास मदत होईल.

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

सिंक, नळ आणि बाथरुमच्या टाइल्सवरील डाग काढून टाकण्यासाठी आपल्याला अॅपल सायडर व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र करावा लागेल. त्यानंतर डाग असणाऱ्या ठिकाणी लावा. १५ ते २० मिनिटानंतर मायक्रोफायबर कापडाने पुसा.

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

नळ, शॉवर यावर पाण्याचे डाग किंवा गंज लागतो. अशावेळी यावर बेकिंग सोडा आणि डिशवॉशचा स्प्रे तयार करा. पाच मिनिटानंतर स्पंज घासून घ्या. यामुळे डाग निघून जाण्यास मदत होतील.

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

मंदिर आणि मुर्तीवर धूळ साचली असेल किंवा घाण झाले असतील तर पितळी मूर्ती स्वच्छ करण्यासाठी सायट्रिक अॅसिड आणि पाण्याची पेस्ट बनवा. हलक्या हाताने घासून घ्या. मूर्ती काही वेळात चमकेल.

Diwali Home cleaning : दिवाळीची साफसफाई होईल काही मिनिटांत, ५ टिप्स- किचन ते बाथरुमपर्यंत टाईल्स चमकतील लख्ख

पंखे किंवा फॅनवर देखील धूळ साचते. साफ करण्यासाठी ओल्या कापडाने किंवा एक्सटेंडेबल डस्टरने स्वच्छ करा.