1 / 8दिवाळी म्हटलं की घरभर उत्साह, सणाचा आनंद आणि सजावट. घराची साफसफाई, फराळा मंद सुगंध यामुळे घर अधिक सुंदर दिसत पण दिवाळीचा खरा आनंद हा दारासमोरच्या रांगोळीमुळे येतो. (Diwali rangoli designs)2 / 8दिवाळीत रांगोळी काढायला प्रत्येकाला वेळ मिळत नाही. मोठ्या रांगोळ्या काढणं जमत नसेल तर काही सोप्या बॉर्डर डिजाईन्सच्या रांगोळ्या काढू शकता. या रांगोळ्या काढण्यासाठी फार वेळ लागत नाही. अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने रांगोळ्या कशा काढायच्या पाहूया. (Door border rangoli)3 / 8अनेकदा आपल्या घराच्यासमोर जागा कमी असते. अशावेळी बॉर्डर रांगोळी डिझाइन सुंदर दिसते. दारासमोर आपण कमळाची पारंपरिक रांगोळी काढू शकतो. 4 / 8आपल्याला साधी सोपी रांगोळी काढायची असेल तर घराच्या मंदिराच्या किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर फुलांची रांगोळी काढू शकता. 5 / 8पाने किंवा देठाचे डिझाइन्स आपल्या दाराची शोभा अधिक वाढवतात. ही साधी-सोपी रांगोळी डिझाइन्स नक्की काढून पाहा. 6 / 8दाराच्या एका कोपऱ्यात पान किंवा लहान फुले काढून आपण त्यात रंग भरू शकतो. ही काढायला आणि बनवायला अधिक सोपी आहे. 7 / 8जर आपल्याला दाराभोवती रांगोळी काढायची असेल तर ही लहान बॉर्डर असलेली रांगोळी घराला छान लूक देईल. 8 / 8दाराच्या समोर झिगझॅग पॅटर्न असलेली रांगोळी डिझाइन तयार करा आणि मोराच्या पिसांनी फुले रंगवा.