1 / 8बाथरुम सुंदर आणि स्वच्छ दिसण्यासाठी आपण त्याठिकाणी अशा अनेक आकर्षित गोष्टी ठेवतो. परंतु, बाथरुमसाठी काही वस्तू खरेदी करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. (Things not to keep in bathroom)2 / 8बाथरुम हा घराचा सर्वात स्वच्छ आणि महत्त्वाचा भाग समजला जातो. म्हणून आपण त्याच्या रचनेकडे अधिक लक्ष देतो. अनेकदा टीव्ही सिरियलमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपले बाथरुम ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण असे करणे आपल्याला महागात पडू शकते. (Bathroom hygiene tips)3 / 8बाथरुमचे सामान खरेदी करताना आपण अशा अनेक सामान्य चुका करतो ज्यामुळे साफसफाई करताना आपल्या अंगाशी येतात. त्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. (Common bathroom mistakes)4 / 8आपण बाथरुममध्ये इंग्लिश टॉयलेट बसवू शकतो. यामुळे साफ करणे सोपे होते. तसेच धुळ देखील साचत नाही. 5 / 8ओव्हरहेड बेसिंगऐवजी अंडरमाउंट बेसिंग चांगले असते. काउंटरटॉप हा हाताच्या एका फटक्यात स्वच्छ होईल. यावर ग्रीस आणि घाण जमा होणार नाही. 6 / 8नॉर्मल शॉवरऐवजी आपण लांब शॉवरचा वापर करु शकतो. यामुळे पाणी भिंतीवर नाही तर थेट जमिनीवर पडेल. अशावेळी गळतीची समस्या कमी राहिल. 7 / 8बाथरुममध्ये आरसा लावत असाल तर त्याच्या बाजूला लाईट लावा. ज्यामुळे मेकअप करण्यासाठी आपल्याला सोपे जाईल. 8 / 8बाथरुमसाठी उभ्या गिझरऐवजी आडवा गिझर लावा, जे कमी जागा घेईल. गिझर आणि त्याच्या आजूबाजूची जागा देखील नीट साफ करता येईल.