फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

Updated:January 12, 2026 16:03 IST2026-01-12T15:57:06+5:302026-01-12T16:03:07+5:30

Decorate the hall of the house in just 1000 rupees, make it look beautiful with cool things : घराचा हॉल सुंदर दिसेल. फक्त या वस्तू आणा. स्वस्तात मस्त.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

घराचा हॉल सुंदर दिसावा यासाठी फार महागड्या वस्तूंची गरज नसते. योग्य निवड आणि थोडी कल्पकता वापरली तर साध्या आणि स्वस्त वस्तूंमधूनही हॉलला छान आणि प्रसन्न लूक देता येतो.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

हॉलमध्ये सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती भिंत. भिंती मोकळ्या वाटत असतील तर साध्या फोटो फ्रेम्स लावता येतात. घरच्या आठवणींचे फोटो किंवा निसर्गचित्रे लावल्यास हॉलला आपुलकीचा आणि जिवंतपणा येतो. बाजारात कमी किमतीत सुंदर फ्रेम्स सहज मिळतात. तसेच वॉल स्टिकर्स किंवा हलके वॉल आर्ट्स वापरल्यास भिंती न सजवता देखील आकर्षक दिसू लागतात.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

हॉलमध्ये ठेवलेले छोटे टेबल डेकोरही महत्त्वाचे ठरते. साधी फुलदाणी आणि त्यात ताजी फुले किंवा कृत्रिम फुले ठेवली तर हॉल अधिक सजलेला वाटतो. छोटा डेकोरेटिव्ह ट्रे, मेणबत्त्या किंवा एखादी शोभेची वस्तू टेबलवर ठेवली तरीही सौंदर्य वाढते.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

प्रकाशयोजना हा हॉलच्या सौंदर्यात मोठा फरक घडवणारा घटक असतो. साध्या बल्बऐवजी हलके पिवळसर लाईट, फेरी लाईट्स किंवा टेबल लॅम्प वापरल्यास हॉल अधिक उबदार आणि आकर्षक दिसतो. सायंकाळच्या वेळी हा प्रकाश घरात शांत आणि प्रसन्न वातावरण निर्माण करतो.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

सोफ्यावर ठेवलेली कुशन कव्हर्स आणि थ्रो ब्लँकेट्स हॉलला लगेच नवीन लुक देतात. साध्या सोफ्यावर रंगीत किंवा प्रिंट असलेली कुशन कव्हर्स ठेवल्यास हॉल अधिक उठावदार दिसतो. ही कव्हर्स हंगामानुसार बदलता येतात. त्यामुळे कमी खर्चात बदलही करता येतो.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

हॉलमध्ये थोडीशी हिरवळ असली की संपूर्ण वातावरण बदलते. लहान कुंड्यांमधील रोपं जसे की मनी प्लांट, स्नेक प्लांट किंवा आरिका पाम ही झाडे कमी प्रकाशातही टिकतात आणि हॉलला ताजेपणा देतात. ज्यांना रोज झाडांची काळजी घेणे शक्य नाही, त्यांच्यासाठी नकली प्लांट्सही चांगला पर्याय ठरतात.

फक्त १००० रुपयांत सजवा घराचा हॉल, लोकही म्हणतील घर हो तो ऐसा-पाहा स्वस्तात मस्त वस्तू

भिंतीवर किंवा सोफ्यासमोर लावलेला एक साधा आरसा हॉल मोठा आणि उजळ दिसण्यास मदत करतो. फार मोठा किंवा महागडा आरसा नको, तर साध्या फ्रेममधला आरसाही पुरेसा असतो.