Chocolate Day 2022 Memes : सिंगल लोकांना चॉकलेट डे साजरा करण्याची भारी हौस; सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस
Updated:February 9, 2022 14:05 IST2022-02-09T13:14:40+5:302022-02-09T14:05:27+5:30
Chocolate Day 2022 Memes : या निमित्ताने सोशल मीडियावर #ChocolateDay ट्रेंड करत आहे आणि या अंतर्गत यूजर्स मजेदार मीम्स पोस्ट करत आहेत.

आज व्हॅलेंटाईन (Valentine Week) वीकचा तिसरा दिवस असून हा दिवस चॉकलेट डे Chocolate Day 2022) म्हणून साजरा केला जातो. रोज डे आणि प्रपोज डे नंतर लोक चॉकलेट डे मोठ्या उत्साहात साजरा करतात. या खास दिवशी जोडपे एकमेकांना चॉकलेट गिफ्ट करतात.
या निमित्ताने सोशल मीडियावर #ChocolateDay ट्रेंड करत आहे आणि या अंतर्गत यूजर्स मजेदार मीम्स पोस्ट करत आहेत. असे अनेक मजेशीर मीम्स आणि जोक्स पोस्ट केले जात आहेत.
चॉकलेट साजरा सेलिब्रेशनपेक्षा मीम्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत.
चॉकलेट डे दरवर्षी 9 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्याची सर्वाधिक क्रेझ कपल्समध्ये पाहायला मिळते.
चॉकलेटचा इतिहास 4 हजार वर्षांचा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चॉकलेट डे हा सर्वप्रथम ख्रिश्चन फेस्ट डे म्हणून साजरा करण्यात आला.
चॉकलेट हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. जगभरातील सर्व वयोगटातील लोकांना चॉकलेट आवडते.