Join us   

पहा सेलिब्रिटी आणि त्यांच्या घरचे गणपती बाप्पा! प्रत्येकानेच केलंय एकापेक्षा एक भारी डेकोरेशन, बघा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2022 5:08 PM

1 / 9
१. गणेशोत्सवाचा उत्साह सध्या घरोघरी दिसतो आहे. अनेक घरांमध्ये तर गणपती काल बसले आणि आज त्यांचं विसर्जनही झालं. आपण ज्या उत्साहाने गणपती बसवतो, त्याची सगळी तयारी करतो, तसंच वातावरण सेलिब्रिटींच्या घरीही असतं.
2 / 9
२. गणपतीसाठी हौशीने सगळी तयारी करणाऱ्या तसंच त्याच्यासाठी आकर्षक सजावट करणाऱ्या सेलिब्रिटी मंडळींची ही बघा एक छानशी झलक. बघा तुमच्या आवडीच्या सेलिब्रिटींनी गणेशोत्सवाची तयारी कशी केली होती आणि कसा होता त्यांच्या घरचा बाप्पा..
3 / 9
३. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या घरचा हा श्रीगणेशा.. सुंदर मुर्ती आणि साधं पण देखणं डेकोरेशन हे त्याचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
4 / 9
४. मराठी अभिनेता सुबोध भावे याने त्याच्या घरच्या गणपतीसोबत काढलेला हा सेल्फी सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
5 / 9
५. अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि तिच्या घरचा गणपती. गणपतीच्या आजूबाजूची सजावट अतिशय मोहक झाली असून स्मिताही गुलाबी रंगाच्या साडीत गोड दिसते आहे.
6 / 9
६. विनोदवीर कपिल शर्मा त्याच्या घरच्या गणपतीचं मनोभावे दर्शन घेताना.
7 / 9
७. हा फोटो शिल्पा शेट्टीच्या घरचा यावर्षीचा गणपती म्हणून व्हायरल होत आहे. तिनेच तो फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण तो यावर्षीचा नसावा, असा अंदाज आहे. कारण नुकताच शिल्पाचा अपघात झाला असून अजूनही तिच्या एका पायाला फ्रॅक्चर आहे. जे या फोटोत दिसत नाहीये.
8 / 9
८. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या घरचा हा बाप्पा.. बाप्पाची पूजा करताना सोनाली देखील अतिशय सुंदर दिसते आहे.
9 / 9
९. अभिनेत्री सारा अली खान हिने आई अमृता सिंग हिच्यासोबत गणपती बसवला. तिच्या घरच्या गणपतीच्या भोवतीची सजावट देखील अतिशय मोहक झाली होती.
टॅग्स : गणेशोत्सवगणेशोत्सवसेलिब्रिटीबॉलिवूड