Join us

पितळी समया-निरांजनवर काळेकुट्ट मेणचट थर? ४ सोप्या टिप्स-न घासताच दिवे उजळतील लख्ख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 13:32 IST

1 / 6
श्रावण महिन्याची सुरुवात ही दीप अमावस्येने होते. या दिवशी आपण घरात दिव्याची आरास करतो. घरातील प्रत्येक कानाकोपरा हा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. दीप पूजनानिमित्त आपण देवघरात ठेवलेली समई-दिवे हमखास काढतो. पण त्यावर जमलेली धूळ, घाण आणि चिकट थर पाहून आपला जीव नकोसा होतो. (Brass pooja items cleaning)
2 / 6
पूर्वी दिवे साफ करण्यासाठी माती, कोळसा किंवा त्याची राख, लाकडाची राख असं विविध घरगुती उपाय करुन आपण ते चमकवत असतं. परंतु आता बाजारात अनेक नवीन लिक्विड, पावडरमुळे दिवे चमकवण्यास मदत होते. जर आपल्यालाही देवघरातील दिवे, समया चमकवायच्या असतील तर सोपे उपाय करुन पाहा.(Clean brass diya at home)
3 / 6
दिव्यांमध्ये तेलाचा थर साचला असेल आणि ते अधिक चिकट झाले असतील तर ते आधी स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर लिंबू आणि मीठाच्या पाण्यात काही वेळ ठेवा. नंतर गरम पाण्याने धुवा.
4 / 6
आपल्या घरात बेकिंग सोडा आणि लिंबू सहज मिळतो. जर समई किंवा दिव्यांवर तेल अधिक प्रमाणात चिकटले असेल तर गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. या द्रावणात १५ ते ३० मिनिटे दिवे बुडवून ठेवा. टूथब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने घासा.
5 / 6
व्हिनेगरने दिवा साफ केल्यास घाण काढून टाकण्यास मदत होते. त्यासाठी कोमट पाण्यात व्हिनेगर आणि डिश वॉश मिक्स करुन लिक्विड तयार करा. या पाण्यात काही मिनिटे ठेवा. नंतर स्क्रबर किंवा जुन्या कापडाने पुसा.
6 / 6
दिवे साफ करताना हातात सॉक्स घाला. बेकिंग पावडर किंवा इतर घटकांचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो. दिवा स्वच्छ केल्यानंतर कोरड्या कापडाने पुसून उन्हात ठेवा. ज्यामुळे ओलावा येणार नाही.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स