Join us

घरभर सतत झुरळं होतात? ४ सोपे उपाय- पेस्ट कंट्रोलपेक्षा जालीम-झुरळं कायमची जातील पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2025 12:22 IST

1 / 5
पावसाळा सुरु झाला की स्वयंपाकघराच्या ओट्यावर किंवा सिंकमध्ये झुरळ फिरु लागतात. किचनमधील पदार्थांवर किंवा भाज्यांवर ते फिरताना दिसतात. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. (Home remedies for cockroaches)
2 / 5
या झुरळांना पळवून लावण्यासाठी आपण विविध केमिकल्सचा वापर करतो. पण तरीही काही केल्या झुरळ काही जात नाही. झुरळांना घराबाहेर काढण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले तर अवघ्या काही मिनिटांत ते घराबाहेर पळून जातील. (Natural ways to get rid of cockroaches)
3 / 5
आपल्या घरात वारंवार झुरळं असतील तर आपण बेकिंग सोड्यामध्ये गरम पाणी घालून त्याचा स्प्रे तयार करा. हा स्प्रे किचन, सिंक आणि बाथरुममध्ये मारा. बेकिंग सोड्याच्या वासामुळे झुरळं घराबाहेर निघून जातील.
4 / 5
लिंबाचा रस देखील झुरळा घालवण्यासाठी प्रभावी उपाय आहे. यासाठी त्याचा स्प्रे तयार करुन घरातील कानाकोपऱ्यात मारा. ज्यामुळे लिंबाच्या वासामुळे झुरळं पळून जातील.
5 / 5
स्वयंपाकघरात आढळणारा तेजपत्ता झुरळांना घालवण्यासाठी फायदेशीर आहे. याची पावडर बनवून घरातील कानाकोपऱ्यात टाका.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स