‘बॅडपॅच’असतानाही ती त्याच्यासोबत ठाम उभी राहिली म्हणून..! विराट कोहली-अनुष्का शर्माची लव्हस्टोरी
Updated:May 12, 2025 18:08 IST2025-05-12T16:34:49+5:302025-05-12T18:08:33+5:30
Because she always stood by him in 'Downfall'..! Virat Kohli-Anushka Sharma's love story : विराट आणि अनुष्काची प्रेमकहाणी. प्रत्येक प्रसंगी अनुष्काने दिली साथ.

भारतात महिलांना सेलिब्रिटी क्रश कोण? असा प्रश्न विचारल्यावर एखाद्या अभिनेत्याचे नाव जेवढे घेतले जात नाही, तेवढे नाव एका क्रिकेटरचे घेतले जाते. तो म्हणजे विराट कोहली. जगभरात कोहलीचे दिवाने आहेत. त्याची लोकप्रियता अफाट आहे.
विराट आणि अनुष्का शर्मा डेट करत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सगळीकडे नक्की काय आहे याचीच चर्चा होती. दोघांनीही लग्न ठरेपर्यंत त्यांचे नाते गुप्तच ठेवण्याचा प्रयत्न केला.
२०१३ ला एका शाम्पू प्रॉडक्टसाठी विराट आणि अनुष्काला एकत्र काम करायची संधी मिळाली. शाम्पूच्या जाहिरातीचे शुटींग करण्यासाठी त्या दोघांची भेट झाली होती. अनुष्काला भेटल्यावर काय बोलावे हे विराटला सुचत नव्हते त्यामुळे त्यांच्या पहिल्या भेटीत फार काही गप्पा वगैरे झाल्या नाहीत.
मात्र जाहिरातीचे शुटींग संपल्यावर त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. काम नसतानाही ते ऑनलाइन कनेक्टेड होते. हळूहळू त्यांच्या भेटीही होऊ लागल्या. अनुष्का विराटचे सामने पाहायलाही जाऊ लागली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले.
२०१४ मध्ये सगळीकडे चर्चा होती ती विराट व अनुष्काचे नक्की काय चालू आहे याचीच. विराटची फलंदाजी जरा गडबडत होती. त्याचा गेम फार काही छान चालत नव्हता. मात्र त्याचा दोष सगळ्यांनी अनुष्काला द्यायला सुरवात केली. लोकांनी तिला ट्रोल करायला सुरवात केली.
अनुष्काने कशावरही काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र ते एकत्र दिसायचे कमी झाले. विविध कार्यक्रमांमध्ये किंवा इतर ठिकाणी मात्र अनुष्कासमोर विराटचे नाव मुद्दाम घेतले जायचे त्यावर ती लाजून हसायची. त्यामुळे लोकांची खात्री पटली होती काही तरी नक्कीच आहे.
२०१७ मध्ये विराट व अनुष्काने लग्नाचा निर्यण घेतला आणि मग सगळ्यांची खात्रीच पटली. नंतर विराटने त्याच्या वाईट फॉर्मसाठी नाही तर चांगल्या खेळासाठी अनुष्का जबाबदार आहे असेही सांगितले होते.
विराट व अनुष्काच्या सुखी संसाराला आता ८ वर्षे झाली आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मुलीचे नाव वमिका आहे तर मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. लोकप्रिय असलेल्या सेलिब्रिटी कपल्सपैकी एक म्हणजे मिस्टर अॅण्ड मिसेस कोहली.
विराटने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अनुष्काने लिहिलेली पोस्ट इमोशनल आहे. ती म्हणते जगाला तुझं यश दिसतं, पण तू न दाखवलेले अश्रू मी पाहिली आहे. तुझी मेहनत पाहिली आहे. प्रत्येक सामन्यानंतर बदललेला, अधिक चांगला खेळाडू, चांगला माणूस झालेला विराट मी पाहिला आहे..