Join us

ज्येष्ठा- कनिष्ठा गौरींसाठी झटपट तयार करा सुंदर बॅकड्रॉप- ७ डेकोरेशन आयडिया, आरास होईल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 16:18 IST

1 / 8
ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे आगमन आता लवकरच होणार आहे. त्यांच्यासाठी कशी आरास तयार करावी असा प्रश्न पडला असेल तर या काही बॅकड्रॉप डेकोरेशन आयडिया पाहा...
2 / 8
दोन रंगांच्या साड्यांचा वापर करून तुम्ही असा बॅकड्रॉप तयार करू शकता. किंवा असा नेटचा कपडा बाजारात विकतही मिळतो.
3 / 8
बॅकड्रॉपचा हा एक सोपा प्रकार पाहा. यामध्ये एक प्लेन कपडा मागच्या बाजूने लावून समोरच्या बाजूने फक्त रेडिमेड मिळणाऱ्या फुलांच्या माळा लावल्या आहेत.
4 / 8
अशा प्रकारचे बॅकड्रॉप तुम्ही ऑनलाइन शॉपिंग साईटवरून अगदी स्वस्तात मागवू शकता.
5 / 8
वेगवेगळ्या रंगांच्या ओढण्या वापरून असा सुंदर बॅकड्रॉप तयार करता येतो.
6 / 8
फुलांच्या माळा जर थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि कलात्मकतेने लावल्या तर बघा किती सुंदर लूक येऊ शकतो.
7 / 8
अशा पद्धतीची रेडीमेड फुलांची कमान तुम्ही विकत आणू शकता. आर्टिफिशल फुलांची कमान वापरली तरी चालेल. मागे एखादी आकर्षक रंगाची साडी किंवा कपडा लावला की तुमचं डेकोरेशन झालं तयार.
8 / 8
खऱ्या फुलांच्या माळा लावून असं सुंदर डेकोरेशनही करता येतं.
टॅग्स : गृह सजावटसोशल व्हायरल