अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

Published:January 22, 2024 12:24 PM2024-01-22T12:24:31+5:302024-01-22T12:57:56+5:30

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

अयोध्येसकट गल्ली ते दिल्ली असं सगळं वातावरणच सध्या राममय झालं आहे. याला बॉलीवूड सेलिब्रिटी तरी अपवाद कसे असतील. अयोध्येत होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

आलिया भटने (Alia Bhat) सुंदर आकाशी रंगाची साडी नेसली असून उजव्या खांद्यावरून तशाच रंगाची शाल तिने घेतली. तर रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) धोती आणि कुर्ता आणि त्यावर शेला असा सुंदर एथनिक लूक केला होता.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

माधुरी दिक्षितने (Madhuri Dixit) अयोध्येत येण्यासाठी पिवळ्या रंगाच्या सुंदर साडीची निवड केली आहे. तर डॉ. श्रीराम नेने यांनीही धोती- कुर्ता घालून अयोध्येत हजेरी लावली.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

कंगना रानौतने (Kangana Ranaut) पहाटे अयोध्येतील हनुमान मंदिरात झालेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. तिने हातात झाडू घेऊन मंदिराची साफसफाई केली. त्यानंतर सुंदर पांढऱ्या रंगाची साडी नेसून ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात हजर झाली.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल या दाम्पत्यानेही मोठ्या उत्साहात अयोध्येला हजेरी लावली आहे. गोल्डन रंगाच्या चमकदार साडीत कतरिना सुंदर दिसत होती.

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पोहचलेल्या सेलिब्रिटींचे सुंदर पारंपरिक लूक : माधुरी दीक्षित ते आलिया भट

सायना नेहवाल आणि मिताली राज यांनीहीी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे.