Join us
Daily Top 2 Weekly Top 5

केसांत माळलेलं फूल-गालावर खळी आणि सिल्कची सुंदर साडी.. आशाताईंचं हे रुप कसं कोण विसरेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 13:58 IST

1 / 6
आशा भोसले. त्यांचं जाणं साऱ्यांच्याच जगण्यात पोकळीसारखं. आपल्या साऱ्या सुखदु:खात त्यांचं गाणं सोबत होतं, सोबत आहे. आणि त्या गाण्यासोबत आठवतो एक प्रसन्न चेहरा. गालावरची खळी, मिश्किल हसू, नजरेत चमक. कपाळावरची मोठी टिकली, केसांत उजव्या किंवा डाव्या बाजुने माळलेली फुलं, मोत्यांच्या माळा आणि देखण्या साड्या. हातातल्या हिऱ्याच्या बांगड्या. साधेपणातलं आदबशीर साैंदर्य त्यांच्याकडे होतं.
2 / 6
अलिकडेच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नात त्यांची शेवटची झलक पाहायला मिळाली. त्यावेळीही त्यांचं रूप असंच होतं.. शांत आणि पवित्र.. अंगावर मोतिया रंगाची साडी आणि केसांत माळलेली फुलं...
3 / 6
छान टापटिप राहायला त्यांना आवडत असे. पण म्हणून कधी कोणत्याही बदलत्या फॅशनच्या मागे त्या धावल्या नाहीत. फॅशन येते आणि जाते, पण दोन्ही खांद्यावरचा पदर, मोत्याची माळ, बांगड्या-टिकली आणि प्रसंगाला साजेशी साडी हे त्यांचं स्टाइल स्टेटमेंट त्यांच्या गाण्यासारखंच कायम सदाबहार.
4 / 6
सिल्कच्या सुंदर त्यांना आवडत. पांढऱ्या, मोतिया रंगाच्या साड्या त्यांनी जास्त नेसल्या. साड्याांच्या रंगातही कधीच भडकपणा नव्हता. त्यांची अभिरुची त्यातून सहज कळावी. महाराष्ट्राची पैठणी त्यांना विशेष आवडत असली तरी बनारसी, कांजीवरम या साड्यांवरही त्यांचं विशेष प्रेम होतंच...
5 / 6
आशाजींच्या दागिन्यांमध्येही खूप नजाकत होती. सोन्याच्या दागिन्यांपेक्षा मोत्यांचे, हिऱ्यांचे दागिने त्यांच्या अंगावर जास्त पाहायला मिळायचे. एकच देखणा दागिना, त्याला शोभणारे कानातले आणि बांगड्या असं एवढंच. आजची मिनिमल फॅशन त्यांना कधीच उमजली होती.
6 / 6
त्या एकदा म्हणाल्या होत्या, वय ८५ च्या आसपास असेल तेव्हा, शो बिझनेसमध्ये नायिका येतात जातात, या वयापर्यंत मी गाते आहे. गाण्यानं मला ही काळानुरुप चालण्याची ताकद दिली!
टॅग्स : फॅशनआशा भोसलेदागिनेसाडी नेसणे