1 / 7मुंबईमध्ये आयोजित लॅक्मे फॅशन वीकमध्ये, अंतरा मोतीवाला मारवाहने बेबी बंप दाखवत मोठ्या उत्साहात रॅम्प वॉक केला. अंतरा मारवाह ही बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर व अर्जुन कपूरचा आत्ते भाऊ आणि अभिनेता मोहित मारवाह याची पत्नी आहे(Antara Marwah wows everyone as she bares her baby bump on ramp).2 / 7अंतराने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी अंतराची लेक थियाचा जन्म झाला. अंतरा आता दुसऱ्यांदा गरोदर असतांना तिने अतिशय बिनधास्तपणे रॅम्प वॉक केला आहे. 3 / 7अंतराने रॅम्प वॉक करताना प्लंजिंग नेकलाइन असणारा शिमरी क्रॉप टॉप आणि त्यालाच मॅचिंग असा लॉंग मरमेड स्कर्ट परिधान केला.4 / 7ग्लॅमरस लूक येण्यासाठी तिने केसांच्या मध्यभागी भांग पाडून केस मोकळे ठेवले होते. लूक पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या पोशाखासोबत क्लिअर स्ट्रॅपी हील्सची जोडी पायात घातली होती. सुंदर हेअरस्टाईलसह तिने न्यूड मेकअप केला आहे. न्यूड लिपस्टिक, कोल्ड आइज मेकअपमध्ये अंतरा अधिकच खुलून दिसत होती. 5 / 7अभिनेत्री जान्हवी कपूर व अर्जुन कपूरची काकी महीप कपूर यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांनी अंतराच्या रॅम्प वॉकवर प्रतिक्रिया देत तिचे कौतुक केले आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करून अंतराचे कौतुक केले आहे.6 / 7अनिल कपूरचा भाचा मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला हे दोघेही २०१८ साली विवाह बंधनात अडकले होते. 7 / 7अंतरा स्टाईल आयकॉन म्हणून ओळखली जाते.