Join us

बाई होण्यासाठी क्रिकेट सोडलं, अपमान पचवले पण..? अनाया बांगरचा स्वत:ला बदलण्याचा अस्वस्थ संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 16:01 IST

1 / 8
संजय बांगर हा भारताचा माजी क्रिकेटपट्टू आहे. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती संजय बांगरची मुलगी अनाया बांगरची. लिंगबदल शस्त्रक्रिया करुन आर्यनची अनाया झाल्यावर ती नुकतीच भारतात परतली आहे.
2 / 8
आर्यन बांगर क्रिकेटही खेळत असे. पण वयाच्या आठव्या वर्षापासून त्याला वाटत होते की आपण मुलगी आहोत. पुढे तरुण होताना त्यानं लिंगबदल शस्त्रक्रिया केली. क्रिकेटही तेव्हा तो उत्तम खेळत असे.
3 / 8
हार्मोन चेंज ट्रिटमेंट करुन लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता अनाया बांगर नव्या ओळखीसह भारतात परतली आणि माध्यमांना दिलेल्या स्फोटक मुलाखतीमुळे गाजते आहे.
4 / 8
अनाया आता इंग्लंडमध्ये राहते. आयसीसीने निर्णय घेतला आहे की ट्रान्स महिलांना यापुढे महिला संघात खेळता येणार नाही. या निर्णयाचे आपल्याला वाईट वाटल्याचे तिने नुकतेच सांगितले.
5 / 8
अलिकडेच भारतात परतल्यावर तिने सांगितले की काही नावाजलेले क्रिकेटर्स तिला नग्न फोटो पाठवत होते. कारमध्ये ये म्हणत होते असंही तिने माध्यमांना सांगितले.
6 / 8
मात्र ज्या खेळावर आपलं जीवापाड प्रेम आहे, बाई होण्यासाठी तो खेळही सोडून द्यावा लागला असं अनाया स्वत:च्या प्रवासाविषयी सांगते.
7 / 8
एका जुन्या क्रिकेटरने तिला कारमध्ये वाईट कारणासाठी बोलवले होते असे अनाया म्हणाली. तिचे हे आरोप गंभीर असल्याने नेटकरी अवाक झाले आहेत.
8 / 8
क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रचंड पुरूषी अहंकार आहे. तसेच हे क्षेत्र सगळ्यांसाठी सुरक्षित नाही असेही अनाया म्हणाली.
टॅग्स : सेलिब्रिटीसोशल व्हायरलव्हायरल फोटोज्