1 / 10१. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात.. आपल्याच दुनियेत मश्गुल असणारं आणि एकमेकांवर भरपूर प्रेम करणारं बी टाऊनमधलं एक राेमॅण्टिक कपल म्हणजे अभि आणि ऐश.. येस अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची आज १५ वी ॲनिव्हर्सरी...2 / 10२. मेड फॉर इच अदर... असणाऱ्या या जोडप्याचे अनेक रंगतदार किस्से आहेत. या दोघांची पहिली भेट १९९७ साली स्वित्झरलंड येथे झाली. ऐश्वर्या 'और प्यार हो गया' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिथे गेली होती तर अभिषेक अमितजींच्या एका चित्रपटासाठी प्रोडक्शन बॉय म्हणून मदत करत होता. 3 / 10३. 'और प्यार हो गया' चित्रपटाचा अभिनेता होता बॉबी देओल. बॉबी आणि अभिषेक हे लहानपणीचे मित्र. आता एकाच शहरात आहोत म्हटल्यावर त्याने अभिषेकला डिनरसाठी बोलवलं आणि त्याचवेळी त्याने अभिषेक- ऐश्वर्या यांची एकमेकांशी ओळख करून दिली.4 / 10४. ढाई अक्षर प्रेम के आणि अभि- ऐशचा पहिला एकत्रित केलेला चित्रपट. यानंतर गुरू सारखा हिट चित्रपटही या जोडीने केला आणि त्याचवेळी शुटींग, प्रमोशन यामुळे भेटी- गाठी वाढल्याने दोघे एकमेकांच्या जवळ येत गेले.5 / 10५. अशातच अमेरिकेत गुरू चित्रपटाचा प्रिमिअर झाला आणि त्याचवेळी अमेरिकेतील एका हॉटेलच्या बाल्कनीमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले.6 / 10६. या हॉटेलमध्ये तो या आधीही राहिला हाेता. त्यावेळी अर्थातच तो सिंगल होता पण ऐश्वर्या त्याला आवडायला लागली होती. त्यावेळी त्या बाल्कनीत उभे असतानाच त्याच्या मनात विचार आला होता की या बाल्कनीत इथे ऐश्वर्या माझी पत्नी म्हणून माझ्या सोबत असती तर... ज्युनिअर बी यांनी हा त्यांचा विचार सत्यात उतरविला आणि त्याच बाल्कनीत ऐश्वर्याला नेले आणि प्रपोज केले..7 / 10७. ऐश्वर्यानेही तात्काळ संमती दिली. जानेवारी २००७ साली दोघांचा साखरपुडा झाला आणि एप्रिल २००७ साली ऐश्वर्या मिसेस अभिषेक बच्चन म्हणून बच्चन परिवाराचा हिस्सा झाली.8 / 10८. ऐश्वर्याने कधीही टिपिकल संशयखोर पत्नी बनून अभिषेकचा मोबाईल तपासला ना कधीही त्याच्या को- स्टार अभिनेत्रीवर आक्षेप घेतला..9 / 10ऐश्वर्या अभिषेकला तिची सपोर्ट सिस्टीम मानते. अभिषेकची पत्नी म्हणून, आराध्याची आई म्हणून आणि बच्चन परिवाराची सून म्हणून ऐश्वर्याने स्वत:ला अगदी परफेक्ट ॲडजस्ट केले आहे. 10 / 10ऐश्वर्या माझ्याएवढी लोकप्रिय नाही तर माझ्या पेक्षा खूप खूप जास्त लोकप्रिय आहे.. माझ्यापेक्षाही यशस्वी आहे. तिने आजवर जे यश मिळवलं आहे, त्याबद्दल मला तिचा अभिमान आहे, अशा शब्दांत अभिषेक बायकोचं नेहमीच कौतूक करतो.