1 / 7लहान मुलांचे शाळेचे पांढरे सॉक्स खूप लवकर मळतात (cleaning tips for white socks). त्याचप्रमाणे पांढऱ्या किंवा फिक्या रंगाच्या शर्टच्या कॉलरही लवकर खराब होतात.2 / 7मळकट झालेले पांढरे सॉक्स किंवा कॉलर स्वच्छ करणे हे काम अनेक जणींना खूप अवघड आणि वेळ खाऊ वाटते. 3 / 7म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा आणि अजिबात वेळ न घालवता किंवा ब्रशने न घासता शर्टची कॉलर किंवा पांढरे सॉक्स कसे स्वच्छ करायचे याची ही एक मस्त आयडिया पाहा.4 / 7हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये दोन ते तीन लीटर गरम पाणी घ्या. गरम पाण्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घाला.5 / 7याच मिश्रणात आता २ टेबलस्पून व्हिनेगर, अर्धा चमचा डिटर्जंटही घाला. 6 / 7सगळ्यात शेवटी त्या पाण्यामध्ये १ चमचा आपले नेहमीचे खाण्याचे मीठ घाला आणि सगळे पाणी व्यवस्थित हलवून घ्या. 7 / 7आता या पाण्यामध्ये मळकट झालेले सॉक्स किंवा शर्टच्या कॉलरचा भाग भिजत घाला. दीड ते दोन तासांनी भिजवलेले सॉक्स पाण्याच्या बाहेर काढा. तेव्हा सॉक्सचा सगळा कळकटपणा निघून गेलेला दिसेल आणि न घासताही तुमचे सॉक्स अतिशय स्वच्छ झालेले असतील. हे सॉक्स पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. त्याच्यावरचा उरलासुरला मळही निघून जाईल.