प्रत्येक महिलेच्या मोबाइलमध्ये सेव्ह असायलाच हवेत ६ इमर्जन्सी नंबर, घरी-बाहेर सगळीकडे सुरक्षित राहा
Updated:May 1, 2025 18:20 IST2025-05-01T18:14:01+5:302025-05-01T18:20:14+5:30
6 emergency numbers every woman should have saved in her mobile : मदत हवी असल्यास महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या या विभागांबद्दल जाणून घ्या.

कोणत्याही देशात कोणत्याही राज्यामध्ये महिलांवर विविध प्रकारचे अत्याचार होत असतात. त्यामध्ये हिंसा, सायबर क्राइम इतरही प्रकार आहेत. बलात्काराचे वाढते प्रमाण फारच धोकादायक आहे. महिलांनी सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते.
अनेक मुली कामानिमित्त, शिक्षणानिमित्त घरापासून लांब राहतात. अनोळखी शहरांमध्ये वावरताना महिलांना भीती वाटते. अशा महिलांसाठी आणि इतरही सर्व महिलांसाठी काही सेवा उपलब्ध आहेत.
काही अशा साईट्स आहेत ज्या महिलांसाठी कार्यरत असतात. तसेच पुरुषांसाठीही कार्यरत असतात. त्यांच्याशी संपर्क करणे फार सोपे असते. अशा काही कार्यरत विभागांची माहिती प्रत्येक महिलेला असलीच पाहिजे.
महिला हेल्पलाइन - १०९१
महिला अत्याचार , मारहाण, अश्लील वर्तन तसेच छेडछाड असे प्रकार नोंदवण्यासाठी ही हेल्पलाईन आहे. पोलीस विभाग आणि राज्य महिला आयोगा मार्फत हे विभाग कार्यरत असते.
पोलीस कंट्रोल रूम - १००
ही २४ तास चालू असणारी सेवा सगळ्यांसाठीच आहे. अपघात, मारहाण, भांडण कोणत्याही घटनेची नोंद करण्यासाठी ही हेल्पलाईन उपलब्ध असते.
घरगुती हिंसा- १८१
घरगुती अत्याचार जसे की मानसिक त्रास होत असेल किंवा घरच्यांकडून मारहाण होत असेल तर या लाईनशी संपर्क साधावा. हे विभाग महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत चालवले जाते.
चाइल्ड हेल्पलाइन- १०९८
लहान मुलांना मारहाण होत असेल त्यांना काही धोका असेल तर या क्रमांकावर संपर्क करा. महिला आणि तिच्या मुलांवर अत्याचार होत असतील तर हे विभाग मदतीसाठी उपलब्ध आहे.
रेल्वे हेल्पलाइन- १३९
रेल्वेच्या प्रवासा दरम्यान काही अडचणी आली तर त्यासाठी रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधा. रेल्वेमध्ये असुरक्षित वाटत असेल तर हे विभाग मदतीस येते.
सायबर क्राइम हेल्पलाइन- १९३०
महिलांना आजकाल घाणेरडे कॉल्स येतात तसेच अश्लील मेसेज येतात. ऑनलाइन क्राइम वाढत चालले आहे. सायबर क्राइमसाठी सायबर हेल्प घ्या. नंबरशी संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या साईटवर तक्रार नोंदवा.