1 / 7१५ ऑगस्ट १९७५ साली शोले हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. रमेश सिप्पी यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यंदाच्या १५ ऑगस्टला या सिनेमाला ५० वर्ष पूर्ण होत आहे. आजही या चित्रपटातील पात्र, संवाद, संगीत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. (How Sholay portrayed strong women characters)2 / 7इतकंच नाही तर शोलेमधील महिला पात्रं हे स्वत:च्या स्वभावाने आणि निर्णयाने अनेकांच्या मनात आजही घर करतात. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल 3 / 7बसंती हे पात्र बिनधास्त पण बोलकी तरुणी. टाँग्यावर बसून सतत गप्पा मारणारी, आत्मविश्वासाने भरलेली. हे फक्त चित्रपटातील पात्र नव्हतं तर अनेक परिस्थितीला तोंड देणारी धाडसी मुलगी. तिच्यामुळे जगण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. 4 / 7राधा ही शांत, संयमी पण अंतर्माने खंबीर असणारी स्त्री दाखवली होती. ठाकूरच्या आयुष्यातील दु:खातही तिने आधार दिला, स्वत:च्या भावनांकडे दुर्लक्ष करुन दुसऱ्याचं दु:ख तिला मोठं वाटलं. हे स्त्री पात्र त्या काळातील तरुणींसाठी महत्त्वाचं होतं. 5 / 7शोलेमधील “बसंती” ची मौसी. तिच्या बोलण्यात मायेची उब असायची. हास्य-विनोद शैलीमुळे हे पात्र लोकांना अधिक आवडलं. 6 / 7बसंती आणि राधा यांनी त्यांच्या अभिनयाने भावनिक व मानवी पैलू प्रेक्षकांना दाखवले. त्या काळातील सामाजिक गोष्टी पाहताना या पात्रांनी महिलांचं धैर्य, आत्मनिर्भरता आणि त्यागाचं प्रतीक म्हणून छाप सोडली.7 / 7शोलेला ५० वर्षं पूर्ण होताना चित्रपटातील गब्बर, जय-वीरू यांच्यासह बसंती आणि राधा यांची आठवण येणं म्हणजे केवळ नॉस्टॅल्जिया नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील महिला पात्रांच्या प्रवासाचा महत्त्वाच्या टप्प्याला उजळणी देणं आहे.