1 / 6कधी कधी गडद रंगाचे आणि फिक्या रंगाचे कपडे चुकून एकत्र धुतले गेले किंवा ओलसर कपडे एकमेकांवर ठेवले गेले तर गडद रंग फिक्या कपड्यांना लागतो.(How to remove stains from clothes caused by other clothes?)2 / 6असे कपडे मग अजिबात घालता येत नाहीत. म्हणूनच गडद रंगाचे डाग फिक्या कपड्यांना लागलेे असतील तर ते कसे काढावे आणि त्यासाठी घरच्याघरी कोणता उपाय करावा याची ही खास ट्रिक पाहा.(How to remove stains from clothes caused by other clothes?) 3 / 6मेहनतीपेक्षा थोड्याशा ट्रिकी पद्धतीने हे काम झटपट होऊ शकतं. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर ज्याच्यावरचा डाग काढायचा आहे तो कपडा काेमट पाण्यात भिजवून त्याच्यावरचा जेवढा रंग निघून जाईल तेवढा काढून घ्या. यानंतर त्या कपड्यावर थोडं कच्चं दूध घाला.4 / 6आता लिंबाची फोड घेऊन त्या डागावर घासा. पुन्हा स्वच्छ पाण्याने कपडा धुवून घ्या. त्याच्यावरचा डाग निघून जाईल. एका धुण्यात हा डाग नाही निघाला तर पुन्हा हाच उपाय करा. डाग निघून जातील.5 / 6हा एक दुसरा उपायही करू शकता. हा उपाय करण्यासाठी डाग लागलेल्या कपड्यावर गरम पाणी टाका. त्यावर थोडा बेकिंग सोडा टाकून ठेवा. 6 / 6यानंतर त्यावर थोडं डिटर्जंट आणि गरम पाणी घाला. त्यानंतर कपडे धुण्याचा ब्रश घेऊन ते डाग घासून काढा. कपड्यावरचा रंग निघून कपडा अगदी स्वच्छ होईल.