Join us

कोंब क्लिनर न वापरताही कंगवा होईल नव्यासारखा स्वच्छ, बघा २ मस्त देसी जुगाड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 16:34 IST

1 / 6
केसांचं, डाेक्याच्या त्वचेचं आरोग्य जपायचं असेल तर कंगवा नियमितपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे. अगदी महिन्यातून एकदा कंगव्याची स्वच्छता होणं गरजेचं आहे.(2 simple tricks for cleaning comb)
2 / 6
हल्ली कंगवे स्वच्छ करण्यासाठी बाजारात कोंब क्लिनर मिळतात. पण बऱ्याचदा आपल्याकडे ते नसतात किंवा मग असले तरी वेळेवर सापडतीलच याची खात्री नाही.. (how to clean comb without using comb cleaner?)
3 / 6
म्हणूनच कोंब क्लिनर शिवाय कंगवे कसे स्वच्छ करावे, ते पाहूया. यासाठीचा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे एका बादलीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडे डिशवॉश लिक्विड घाला आणि त्या पाण्यात १० मिनिटे कंगवे भिजत ठेवा.
4 / 6
यानंतर कपडे धुण्याचा ब्रश घेऊन कंगव्यांवर घासा. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने कंगवे धुवून घ्या. कंगव्यातली सगळी घाण निघून गेलेली असेल.
5 / 6
दुसरा असाच एक सोपा घरगुती उपाय म्हणजे कंगव्यावर एखादी टाल्कम पावडर घाला.
6 / 6
यानंतर खराब टुथब्रश घेऊन कंगव्यावर घासा आणि त्यामध्ये अडकलेली घाण स्वच्छ करा. यानंतर कंगवा एकदा साबणाच्या पाण्याने धुवून काढा. हा उपाय केल्यामुळेही कंगव्यातली घाण लगेच स्वच्छ होईल.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलकेसांची काळजीहोम रेमेडी