गणेश चतुर्थीला ५ मिनिटांत काढता येतील अशा १० सोप्या रांगोळ्या; आकर्षक रांगोळ्यांनी सजवा दार
Updated:September 2, 2024 20:22 IST2024-09-02T15:30:52+5:302024-09-02T20:22:52+5:30
10 Easy Ganesh Chaturthi rangoli Designs : गणपतीच्या रांगोळीसाठी पिवळा, नारंगी, लाल, हिरवा पांढरा हे रंग वापरू शकता.

गणेश चतुर्थीला म्हणजेच गणपती बाप्पांच्या आगमनाच्या दिवशी दारासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या तर घराची शोभाच जणू वाढते. गणपतीच्या १० दिवसांत तुम्ही रोज एक रांगोळी दारासमोर किंवा देवघरासमोर काढू शकता. (Ganesh Chaturthi rangoli Designs)
अगदी ५ ते १० मिनिटांत काढता येईल अशा सोप्या रांगोळी डिजाईन्स पाहूया.
तुम्हाला रांगोळी काढायला नीट जमत नसेल तर खडू आणून खडूच्या साहाय्याने आकृती उमटवा त्यानंतर रंग भरून मग पांढऱ्या रांगोळीने बॉर्डर आखा.
गणपतीची सुंदर रांगोळी काढण्यासाठी तुम्ही चमचा, बांगडी, हेअरपिनचा वापर करू शकता. हे साहित्य वापरून एक सुंदर रांगोळी तयार होईल.
याशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीचासुद्धा गणपती सुंदर दिसतो. त्यात तुम्ही हवे ते रंग भरू शकता.
गणपतीच्या रांगोळीसाठी पिवळा, नारंगी, लाल, हिरवा पांढरा हे रंग वापरू शकता.
गणपतीच्या रांगोळीत तुम्ही मोरसुद्धा काढू शकता.
गणपतीच्या रांगोळीत जास्वंदाची फुलं काढायला विसरू नका.
रांगोळ्यासाठी तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज पाहू शकता.
(Image Credit- Social Media)