Women's Day 2026 Special: महिला दिनासाठी खास आकर्षक चिकनकारी कुर्ता; १० नवीन डिझाईन्स, कॉन्फिडंट-सुंदर दिसाल
Updated:March 6, 2026 23:22 IST2026-03-06T20:22:46+5:302026-03-06T23:22:37+5:30
Women's Day 2026 Special Outfits Chikankari Kurti Design: सध्या चिकनकारीसोबत बारीक आरश्यांचे काम असलेले कुर्ते खूपच ट्रेंडमध्ये आहेत. जे रात्रीच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरतात.

जागतिक महिला दिनानिमित्त (Women's Day 2026) स्वत:ला एक क्लासी आणि रॉयल लूक द्यायचा असेल तर चिकनकारी कुर्ता हा उत्तम पर्याय आहे. लखनऊची पारंपारीक कला आजही फॅशनच्या जगात अव्वल स्थानावर आहे. (Dresses For Women's Day)
जर तुम्हाला इंडो वेस्टर्न लूक हवा असेल तर चिकनकारी पेपलम कुर्ता जीन्स किंवा धोती पँटसोबत अप्रतिम दिसतो.
सणासुधीच्या किंवा विशेष कार्यक्रमांच्या फिलसाठी फ्लोअर लेन्थ अनारकली चिकनकारी कुर्ता निवडा. जो तुम्हाला एक राणीसारखा लूक देईल.
ऑफिस किंवा फॉर्मल मीटिंगसाठी पांढऱ्या किंवा पेस्टल रंगाचा स्ट्रेट कट कुर्ता किंवा प्लाझो हा सर्वात सोबत पर्याय आहे.
सध्या चिकनकारीसोबत बारीक आरश्यांचे काम असलेले कुर्ते खूपच ट्रेंडमध्ये आहेत. जे रात्रीच्या कार्यक्रमांसाठी योग्य ठरतात.
उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना जॉर्जेट, कॉटन किंवा मलमल फॅब्रिककमधील चिकनकारी कुर्ते निवडणं आरामदायी आणि स्टायलिश ठरेल.
महिला दिनाचे औचित्य साधून जांभळा, गुलाबी आणि पांढरा अशा प्रसन्न रंगांना पसंती द्या.
यात तुम्हाला डार्क लाईट अशा बऱ्याच रंगसंगतीचे कपडे पाहायला मिळतील.
यावर तुम्ही जीन्स किंवा प्लाझो, लेगिन्ज तुमच्या आवडीनुसार काहीही मॅच करून घालू शकता.
चिकनकारी कुर्ता हा फक्त उन्हाळ्यातच नाही तर त्याच्या सॉफ्ट फॅब्रिकमुळे कोणत्याही ऋतूत घालता येईल असा आहे.
या टाईपचे कुर्ता सेट्ससुद्धा सध्या बरेच व्हायरल होत आहेत जे तुम्ही पूजा, लग्नकार्य अशा अनेक प्रसंगांना घालू शकता.