व्हिक्टोरिया मंगळसुत्राच्या १० सुंदर डिजाईन्स, नाव वेगळं वाटतंय? कोणत्याही साडीवर दिसेल उठून
Updated:December 16, 2025 13:40 IST2025-12-16T12:40:27+5:302025-12-16T13:40:13+5:30
Victoria Mangalsutra Designs : व्हिक्टोरिया मंगळसूत्र ही सध्यांच्या दागिन्यांच्या फॅशनमधील सर्वात मोठी ट्रेंडींग गोष्ट आहे.

व्हिक्टोरिया मंगळसूत्र (Victoria Mangalsutra) ही सध्यांच्या दागिन्यांच्या फॅशनमधील सर्वात मोठी ट्रेंडींग गोष्ट आहे. या मंगळसूत्रामध्ये व्हिक्टोरिया युगातील डिझाईन्सची झलक दिसते ज्यामुळे त्यांना एक शाही लूक येतो. (Victoria Mangalsutra Designs)
हे पेंडंट सहजा मोठे, उठावदार आणि किचकट कोरिव काम केलेले असतात. या पेडंटंसना डायमंड टच असतो ज्यामुळे त्यांना सोन्याच्या दागिन्यांसारखी चमक मिळते. (10 Designs Of Victoria Mangalsutra)
यामध्ये सामान्यत: गोल्ड प्लेटिंग, रोज गोल्ड किंवा ऑक्सिडाईज्ड फिनिश वापरली जाते. जी व्हिंटेज लूकला पुरक ठरते.
ही मंगळसूत्र आकारानं थोडी मोठी असल्यानं पारंपरिक वेशभूषा तसंच अधुनिक स्टाईलच्या साड्यांवरही हे मंगळसूत्र उठून दिसतात.
साध्या लहान पेंडंटपासून ते पूर्णपणे जडवलेल्या गळाभर डिझाईन्सपर्यंत अनेक पॅठर्न्स या मंगळसूत्रात उपलब्ध आहेत.
बहुतांश व्हिक्टोरिया मंगळसूत्र हे इमिटेशन ज्वेलरी किंवा चांदीमध्ये बनवलेले असल्यामुळे सोन्याच्या तुलनेत त्यांची किंमत खूपच कमी असते.
अनेकदा हे मंगळसूत्र जुळणाऱ्या कानातल्यांच्या जोडीसोबत उपलब्ध असतात.ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात.
सध्या तरूण पिढीमध्ये शॉर्ट आणि मिडियम लांबीच्या व्हिक्टोरिया मंगळसुत्रांना विशेष मागणी आहे.
सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये या प्रकारच्या दागिन्यांचा वापर वाढल्यामुळे त्यांचा ट्रेंड अधिक लोकप्रिय झाला आहे.
नेहमी तेच तेच सोन्याचं मंगळसूत्र घालण्यापेक्षा तुम्ही फॅन्सी साड्यांवर हे नवीन मंगळसूत्र ट्राय करू शकता.