वटपौर्णिमा स्पेशल : यंदा कानात पारंपरिक बुगडी घाला, पाहा १ ग्रॅममध्ये बुगड्यांचे लेटेस्ट डिझाइन्स
Updated:May 31, 2025 20:05 IST2025-05-31T15:23:32+5:302025-05-31T20:05:32+5:30

वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे अनेकजणी वटपौर्णिमेनिमित्त (Vatpournima 2025) नवी साडी घेतात. ज्यांना शक्य असेल त्या एखादा दागिनाही घेतात. तुम्हालाही या सणासाठी पारंपरिक लूक (traditional marathi look for vat pournima) करून कानात छान मराठमोळी बुगडी घालायची असेल तर हे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहा..(latest pattern of bugadi design)
अशा प्रकारचे कित्येक नाजूक डिझाईन्स बाजारात मिळतात. हे डिझाईन कोल्हापुरी बुगडी म्हणून ओळखले जाते.(latest bugadi earrings design)
मोराचं डिझाईन असणारे कोणतेही दागिने महिलांना विशेष आवडतात. त्यामुळे मोराचं नक्षी असणारी बुगडीही मिळते.
हे एक अतिशय नाजूक डिझाईन पाहा. ही बुगडी एवढी नाजूक आहे की ती तुम्ही अगदी रोजही घालू शकता.
मोत्याच्या बुगड्यांप्रमाणे आता अशा स्टोनच्या बुगड्याही मिळतात.
जर तुम्ही गळ्यात लक्ष्मीहार घातला असेल तर त्याला मॅच करण्यासाठी ही लक्ष्मीहाराचं डिझाईन असणारी बुगडी घाला. तुमचा लूक एकदम परफेक्ट होईल.
या बुगडीचं डिझाईन अतिशय रेखीव आहे. त्यामुळे लग्नकार्यात किंवा सणावाराला घालायला ही अगदी छान वाटेल.
ऑक्सिडाईज प्रकारातल्या बुगड्या घ्यायच्या असतील तर त्यात असे कित्येक नवनविन प्रकार मिळू शकतात.
नुसती पांढऱ्या मोत्यांची किंवा सोनेरी मण्यांची बुगडी घेण्यापेक्षा हल्ली अनेक जणी अशी मल्टीकलर बुगडी घेणं पसंत करत आहेत.
चापेच्या बुगडीचा हा एक आणखी देखणा प्रकार पाहा. या बुगडीला असणाऱ्या झुब्यांमुळे ती खूपच खास वाटते.