1 / 6लग्नसराईच्या निमित्ताने पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या ट्रेण्डिंग असणारे पैठणीचे रंग कोणते ते पाहा.. 2 / 6ही पैठणी रंगाची पैठणी नेहमीच ट्रेण्डिंग असते. पैठणीचा हा मूळ रंग आहे असं म्हटलं जातं. ही नवरीला तर छान दिसतेच, पण सगळ्यांनाच पैठणीचा हा रंग खूप शोभून दिसतो.3 / 6गर्द हिरव्या रंगाची पैठणीही सध्या ट्रेण्डमध्ये आहे. हिरवी पैठणी लग्नसराईच्या निमित्ताने खूप घेतली जाते.4 / 6जांभळी आणि रॉयल ब्लू या रंगाच्या पैठणीलाही सध्या खूप मागणी आहे. या पैठणी अतिशय देखणा लूक देतात.5 / 6या पैठणीला चटणी रंगाची पैठणी म्हणतात. हिचा फिरता रंग अतिशय आकर्षक दिसत असल्याने अनेकींची त्याला पहिली पसंती असते.6 / 6त्याचसोबत मरून रंगाची पैठणीही अनेकींना आवडते आहे. या पैठणीलाही सध्या खूप मागणी आहे.