अस्सल मराठी दागिना; पाहा कुड्यांचे ७ सुंदर डिझाइन्स! लग्नातला साज कुडीशिवाय अपूर्णच..
Updated:March 1, 2025 19:53 IST2025-03-01T17:16:18+5:302025-03-01T19:53:57+5:30

मराठी लूक करायचा म्हटलं की काही मराठमोळे दागिने तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. त्या दागिन्यांपैकी एक आहे कानातल्या कुड्या..(traditional pearl earrings for marathi look)
पुर्वी कुड्या अशा फक्त मोत्याच्याच मिळायच्या. पण आता मात्र त्यात कित्येक वेगवेगळे डिझाईन्स आले आहेत.(motyachya kudya pearl earrings designs)
पिवळसर मोत्यांऐवजी अशा पांढऱ्या मोत्यांच्या कुड्याही अनेकींना आवडत आहेत.(motyache kanatle designs for marathi look)
अशा पद्धतीच्या सोनेरी रंगाच्या ठसठशीत कुड्याही तुमच्या चेहऱ्याला सुंदर लूक देतात.
ठुशी किंवा कोल्हापुरी साजवर मॅचिंग होणाऱ्या अशा प्रकारच्या कुड्याही हल्ली बाजारात मिळत आहेत.
मोत्यांच्या कुड्यांचे हे आणखी एक सुंदर आणि थोडेसे नव्या प्रकारचे डिझाईन पाहा. असे कानातले जर कानात असतील तर आपोआपच तुमचा चेहरा जास्त बोलका आणि रेखीव दिसतो.
ऑक्सिडाईज कानातल्यांची आजही खूप क्रेझ आहे. अशा प्रकारच्या ऑक्सिडाईज किंवा बजेट थोडे जास्त असेल तर चांदीच्या कुड्याही तुम्ही घेऊ शकता.
मोत्याच्या कुड्या आणि त्याला सोन्याच्या बारीक तारेची बॉर्डर.. हे डिझाईनसुद्धा खूप वेगळं असून सहसा कोणाकडे दिसत नाही.