श्रावण स्पेशल: मंगळागौर- राखीपौर्णिमेला ठसकेबाज मराठी लूक हवा? मग मोत्यांचे 'हे' दागिने तुमच्याकडे हवेतच..
Updated:July 16, 2025 16:21 IST2025-07-16T16:01:03+5:302025-07-16T16:21:27+5:30

श्रावणातल्या मंगळागौर, राखीपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला पारंपरिक मराठी लूक करायचा असेल तर तो लूक जास्त आकर्षक होण्यासाठी मोत्यांचे काही पारंपरिक दागिने नक्की घाला..(traditional marathi jewellery)
कारण मोत्याच्या काही दागिन्यांशिवाय तुमचा मराठी लूक पुर्ण होतच नाही. त्यापैकी पहिला दागिना म्हणजे चिंचपेटी. गळ्यात चिंचपेटी घातली तर इतर कोणत्याच दागिन्याची गरज पडत नाही.(pearl jewellery necklace latest patterns)
साडी, नऊवार, सलवार कुर्ता अशा जवळपास सगळ्याच पारंपरिक पोशाखांवर मोत्यांचा तन्मणी शोभून दिसतो. त्यामुळे तन्मणी तुमच्याकडे असायलाच हवा.
नाकात ठसठशीत नथ घातल्याशिवाय तुमचा मराठी लूक अधुराच राहातो. त्यामुळे पारंपरिक धाटणीची नथ तुमच्याकडे नक्कीच असायला हवी.
टिपिकल महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर कानात मोत्याच्या कुड्या हव्याच.. मोत्याच्या कुड्या कानात असल्या की आपोआपच चेहऱ्याला एक भारदस्तपणा येतो.
त्यासोबतच एक सुंदर, नाजुक मोत्याची बुगडी घ्यायलाही विसरू नका. बुगड्यांचे कित्येक नवनविन प्रकार हल्ली बाजारात मिळतात.
आता गळ्यात, कानात एवढे सगळे मोत्याचे दागिने घातले म्हटल्यावर हातात मोत्याच्या बांगड्या हव्याच.. असे कित्येक प्रकारचे आकर्षक डिझाईन्स त्यात मिळत आहेत.
मोत्याच्या अंगठीची मजाही वेगळीच असते. त्यामुळे छान नटून थटून झाल्यावर मोत्याची अंगठी नक्की घाला.