मंगळसूत्र ब्रेसलेट घ्यायचंय? बघा लेटेस्ट फॅशनचे सुंदर मंगळसूत्र ब्रेसलेट डिझाइन्स, नाजूक-स्मार्ट-सुपरट्रेंडी
Updated:March 6, 2024 17:04 IST2024-03-06T16:00:03+5:302024-03-06T17:04:46+5:30

सध्या मंगळसूत्र ब्रेसलेटची फॅशन जबरदस्त ट्रेण्डमध्ये आहे. बॉलीवूड अभिनेत्रीही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे या लेटेस्ट सुपरट्रेण्डी फॅशननुसार तुम्हालाही टिपिकल मंगळसूत्राऐवजी मंगळसूत्र ब्रेसलेट घ्यायचं असेल तर हे काही प्रकार एकदा पाहून घ्या.
हे बघा अतिशय नाजूक असं डिझाईन. त्याला काळ्या मण्यांचं जोडलेलं नाजुकसं लटकन खूप आकर्षक लूक देणारं आहे.
आलिया भटच्या मंगळसूत्रापासून इन्फिनिटीचं हे चिन्ह पेंडंट म्हणून खूप ट्रेण्डींग आहे. तुम्हीही तसं पेंडंट घेऊन त्याला तुमच्या नावाचे इनिशियल्स लावून घेऊ शकता.
हे एक अतिशय क्लासी डिझाईन पाहा. यामध्ये बाजुने फक्त साखळीच आहे. फक्त मध्यभागी काळे खडे आणि पांढरे खडे जडवण्यात आले आहेत.
लग्नसमारंभात घालायला हेवी डिझाईनचं काही बघत असाल तर हा प्रकार छान दिसतो.
हेवी प्रकारातलंच हे एक आणखी छान डिझाईन. यामध्ये त्याला जोडण्यात आलेले छोटेछोटे लटकन खूप छान वाटतात.
रोजच्या वापरासाठी थोडं मजबूत आणि ठसठशीत डिझाईन बघत असाल तर हा एक पर्याय चांगला आहे.
अशा पद्धतीचं मोत्याचं पेंडंट असणारं चांदीचं ब्रेसलेटही तुम्ही घेऊ शकता.
आपल्याकडे मंगळसूत्राला एक किंवा दोन वाट्या असतात. त्यामुळे हल्ली मंगळसूत्र ब्रेसलेटमध्येही अशी एक वाटी जोडण्यात येते.