1 / 7आपणही रोज स्टायलिश दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. कॉलेज, ऑफिस असो किंवा मित्रांसोबतची एखादी छोटी पार्टी. पण फॅशनेबल दिसण्यासाठी नेहमीच महागड्या ब्रँड्सची किंवा हजारो रुपयांच्या कपड्यांची गरज असतेच असं नाही.2 / 7सध्या फॅशनच्या जगात बजेट शॉपिंगचा ट्रेंड जोरदार सुरु आहे. आपल्याला फ्लोरल प्रिंटेज ड्रेस ३०० रुपयांत खरेदी करायचे असतील तर हे ५ पॅटर्न नक्की पाहा. 3 / 7पफ स्लीव्हज मिडी ड्रेस हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. खांद्याजवळ फुगवटा असलेला पफ स्लीव्ह्ज ड्रेस डिझायनर लूक देतो. ३०० रुपयांच्या रेंजमध्ये जॉर्जेट किंवा रेयॉन फॅब्रिकमध्ये मिळतात. 4 / 7आपल्याला इंडो- वेस्टर्न किंवा वेगळा लूक हवा असेल तर रॅप अराउंड पॅटर्नचा ड्रेस ट्राय करु शकता. याची फिटिंग चांगली असल्यामुले आपण अधिक स्लिम दिसतो. 5 / 7आपल्याला गळ्याची डिझाईन साधी पण आकर्षक हवी असेल, तर स्क्वेअर नेक पॅटर्न निवडा. हा पॅटर्न तुमच्या कॉलर बोनला हायलाईट करतो. ज्यामुळे आपल्याला विंटेज सेलिब्रिटी लूक मिळतो. 6 / 7टाय-अप शोल्डर स्लिट ड्रेस हा खांद्यावर गाठ मारता येणारे स्ट्रॅप्स आणि पायापाशी छोटा कट असलेला हा ड्रेस पार्टीसाठी परफेक्ट आहे. फ्लोरल प्रिंटमुळे हा लूक बोल्ड असूनही खूप सॉफ्ट आणि सुंदर दिसतो. 7 / 7शॉर्ट लेअर्ड फ्रॉक हा अनेक मुलींना खूप आवडतो. हा ड्रेस बाऊन्सी असल्यामुळे कॅज्युअल आउटिंगसाठी बेस्ट ठरतो.