नव्या नवरीसाठी २ ते ५ ग्रॅमचे छोटे मंगळसूत्र; १० मॉडर्न डिझाईन्स, ऑफिस-सणवाराला उठून दिसेल
Updated:January 1, 2026 13:04 IST2026-01-01T12:54:14+5:302026-01-01T13:04:55+5:30
Short Mangalsutra For New Bride : प्रेमाचे प्रतिक म्हणून हॉर्ट शेपचे पेंडंट असलेलं मंगळसूत्र सध्या खूपच ट्रेंडींग आहे. अशी मंगळसूत्र नवरीची पहिली पसंती ठरत आहे.

नव्या नवरीसाठी सोन्याच्या लहान मंगळसूत्राचे डिझाईन्स सध्या खूपच लोकप्रिय होत आहेत. २०२६ च्या नवीन ट्रेंडनुसार काही खास डिझाईन्स तुमचा लूक खुलवतील. (Small Mangalsutra For New Bride Daily Use)
नवीन नवरीसाठी दैंनंदिन वापरासाठी २ ते ३ ग्रॅम वजनासाठी १६ ते १८ इंच लांबीचे मंगळसूत्र सर्वात सोयीचे ठरते. (Small Mangalsutra Designs For Women)
कमी वजनामुळे हे खिशाला परवडणारे असते. सोन्याचे दर पाहता बजेटमध्ये राहून एक स्टायलिश दागिना घेता येतो. (Light Weight Mangalsutra For Women)
जरी वजन कमी असले तरी अधुनिक तंत्रज्ञानामुळे ही मंगळसूत्र दैनंदीन वापरासाठी पुरेशी मजबूत असतात आणि उठून दिसतात.
१६ ते १८ इंच लांबीचे मंगळसूत्र गळ्याच्या अगदी खाली राहते. हे डिझाईन्स साडी, कुर्ती किंवा अगदी ऑफिसच्या फॉर्मल शर्टवरही उठून दिसतात.
मिनिमलिस्ट सॉलिटेअर डिझाईन्समध्ये काळ्या मण्यांच्या नाजूक साखळीत मध्यभागी एकच मोठा हिरा किंवा सोन्याचा गोल मणी असतो. हे डिझाईन्स ऑफिस वेअर आणि वेस्टर्न कपड्यांवर अत्यंत मोहक दिसतात.
प्रेमाचे प्रतिक म्हणून हॉर्ट शेपचे पेंडंट असलेलं मंगळसूत्र सध्या खूपच ट्रेंडींग आहे. अशी मंगळसूत्र नवरीची पहिली पसंती ठरत आहे.
कितीही स्टाईल बदलत राहिल्या तरी दोन वाट्यांच्या मंगळसूत्राची फॅशन काही जात नाही. २ वाट्यांचे मंगळसूत्र नेहमीच ट्रेंडींग असते.
पिवळ्या सोन्याऐवजी आता रोज गोल्ड मंगळसूत्रांना देखिल पसंती दिली जात आहे. जे विशेषत: तरूण महिलांमध्ये लोकप्रिय आहे.
स्वत:चे किंवा पतीच्या नावाचे पहिले अक्षर सोन्यात गुंफलेले मंगळसूत्र ही सध्याची एक खास स्टाईल आहे.