लग्नात एकदम उठून दिसेल पेशवाई पैठणी; १० सुंदर रंग, पारंपारीक-रॉयल लूक
Updated:March 5, 2026 17:33 IST2026-03-05T11:37:38+5:302026-03-05T17:33:11+5:30
Peshwai Paithani For wedding Season : सेमी पैठणीपासून ते शुद्ध हातमागावर विणलेल्या पैठणीपर्यंत ४ हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंत विविध श्रेणीत या साड्या उपलब्ध आहेत.

सध्याच्या लग्नसराईत पेशवाई पैठणी ही तिच्या शाही लूक आणि पारंपारीक सौंदर्यामुळे प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. (Peshwai Paithani For wedding Season)
पेशवाई पैठणी ही मराठी साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक मानले जाते. ज्यामुळे ती परिधान केल्यावर एक राजेशाही लूक मिळतो. (Peshwai Paithani in 10 Colors)
या पैठणीची सर्वात मोठी ओळख म्हणजे तिची मुनिया किंवा नारळी बॉर्डर आणि त्यावर असणारे सुबक जरी काम.
सध्या राणी गुलाबी, मोरपंखी, बॉटल ग्रीन, आणि जांभळ्या पेशवाई पैठणईंना लग्नसराईत विशेष पसंती मिळत आहे.
या साड्यांच्या पदरावर मोर, पोपट, कमळ आणि वेलींच्या अतिशय नाजूक आणि भरगच्च नक्षीकामामुळे त्या अधिक उठावदार दिसतात.
ही साडी शुद्ध सिल्कपासून तयार केलेली असल्यामुळे ती वजनाला हलकी आणि नेसायला अतिशय सुटसुटीत असते.
वधूच्या बस्ता खरेदीसाठी किंवा लग्नकार्यातील महत्वाच्या विधींसाठी पेशवाई पैठणीला पहिली पसंती दिली जात आहे.
सध्याच्या ट्रेंडनुसार पैठणीवर पारंपारीक नथ, ठुशी आणि सोन्याचे दागिने घातल्यास सौंदर्य अधिक खुलून येते.
सेमी पैठणीपासून ते शुद्ध हातमागावर विणलेल्या पैठणीपर्यंत ४ हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंत विविध श्रेणीत या साड्या उपलब्ध आहेत.
या पैठणीत तुम्हाला बरेच कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील जे तुम्ही रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता.