1 / 9लग्नसराईनिमित्त नथ खरेदी करणार असाल तर सध्या नथीमध्ये आलेले हे काही वेगवेगळे प्रकार पाहा...2 / 9मोराचं डिझाईन हे अनेक महिलांचं अतिशय आवडीचं. मग ते एखाद्या साडीमधलं असो किंवा कानातल्यावरचं असो.. म्हणूनच तर मोराच्या नथीचे असे कित्येक प्रकार सध्या बाजारात आलेले आहेत.3 / 9विशेष म्हणजे या नथींना प्रचंड मागणी असून अगदी तरुण मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांनाच मोराची नथ घ्यायची आहे..4 / 9अशी सगळ्यांपेक्षा वेगळी असणारी सुंदर नथ आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी.. 5 / 9मोराचा सुबक आकार आणि त्याच्या आजुबाजुला जडविण्यात आलेले खडे, हे डिझाईन तर अगदी वेगळं आहे..6 / 9ऑक्सिडाईज प्रकारातही मोराच्या नथींचे कित्येक पॅटर्न उपलब्ध आहेत.7 / 9मोराचा आकार नसला तरी या नथीवरचं मोरपिस आपलं लक्ष नक्कीच वेधून घेतं..8 / 9या नथ तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता किंवा मग सोनाराकडून घडवूनही घेऊ शकता. 9 / 9आर्टिफिशियल प्रकारातल्या पिकॉक नथ घेतल्या तर त्या अगदी १००- १५० रुपयांपर्यंत मिळून जातील.