कपाटातल्या जुन्या साड्यांचे शिवा सुंदर ड्रेसेस; १० पॅटर्न्स, साडीच्या ड्रेसेसमध्ये एकदम युनिक दिसाल
Updated:December 18, 2025 15:47 IST2025-12-18T15:28:39+5:302025-12-18T15:47:54+5:30
Old Saree Dresses Ideas : अशा प्रकारचे ड्रेसेस सण-समारंभ लग्नकार्य किंवा पूजेसाठी अगदी योग्य ठरतात.

जुन्या साडीचा पुनर्वापर करून नवीन ड्रेस शिवणं ही एक अतिशय कल्पक आणि फायदेशीर कल्पना आहे. जुन्या साड्यांपासून तयार केलेले ८ ड्रेसेसचे पॅटर्न्स पाहूया. (Old Saree Dresses Ideas)
कपाटात पडून असलेल्या जुन्या, जड किंवा सिल्कच्या साड्यांपासून आपण अतिशय सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस तयार करू शकता. (Old Saree Dresses 8 Patterns)
साडीपासून तुम्ही अनारकली ड्रेसेस, लॉन्ग गाऊन्स, कु्र्ता, नऊवारी पॅटर्नचा वन-पीस सुद्धा शिवू शकता.
साडीच्या काठांचा वापर करून गळा, बाह्या किंवा ड्रेसचा खालचा घेर आकर्षक बनवता येतो. यामुळे ड्रेसला डिझायनर लूक मिळतो.
साडीचा पदर हा ड्रेसच्या पुढच्या भागासाठी किंवा ओढणीसाठी वापरता येतो. ज्यामुळे ड्रेस अधिक उठावदार दिसतो.
नवीन कापड विकत घेण्यापेक्षा जुन्या साडीचा वापर केल्यास पैशांचीही बचत होते. जर साडीची लांबी कमी असेल तर त्यापासून लहान मुलांचे फ्रॉक्स, परकर-पोलके किंवा मुलांसाठी कुर्ती-धोती शिवता येतात.
जर साडीची लांबी कमी असेल तर त्यापासून लहान मुलांचे फ्रॉक्स, परकर-पोलकं किंवा मुलांसाठी कुर्ती-धोती सेट्स शिवता येतात.
अशा प्रकारचे ड्रेसेस सण-समारंभ लग्नकार्य किंवा पूजेसाठी अगदी योग्य ठरतात. कारण त्यात पारंपारीक आणि अधुनिक अशा दोन्ही गोष्टींचा संगम असतो