1 / 6गणपतीचे दिवस आले की सगळ्यात आधी आठवण येते ती उकडीच्या मोदकांची. हा मोदक कसा कळीदार झाला की तो खाण्याची मजा आणखी वाढते..2 / 6पण मोदकांना छान कळ्या येणं हे खरोखरच कौशल्याचं काम. आता हेच काम अगदी सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे साचे बाजारात मिळत आहेत.3 / 6अशा प्रकारचे साचे वापरून तुम्ही एकाचवेळी भरपूर मोदक करू शकता.4 / 6अशा पद्धतीचा स्टीलचा साचा घेतला तर तो भरपूर वर्षे अगदी चांगला टिकतो.5 / 6या प्रकारचे साचे उकडीच्या मोदकाप्रमाणेच पेढ्याचे, चॉकलेटचे वेगवेगळे मोदक करण्यासाठीही उपयुक्त ठरतात.6 / 6उकडीच्या मोदकाच्या साच्यांचा हा एक वेगळा प्रकार पाहा. प्रत्येक कळी यातून वेगळी आणि जास्त सुबक तयार करता येते.