1 / 7मंडाला प्रिंट साड्या सध्या खूप चर्चेत आहेत. त्यामुळे आपल्याही कलेक्शनमध्ये अशी एखादी साडी असायलाच हवी.. 2 / 7या साडीची खासियत अशी की जर तुम्ही अगदी सोबर डिझाईन असणारी कॉटनमधली मंडाला प्रिंट साडी घेतली तर ती तुम्ही ऑफिसलाही नेसू शकता.3 / 7अशा प्रकारची मंडाला साडी ज्याप्रमाणे एखाद्या फॉर्मल मिटींगमध्ये चांगली दिसते त्याचप्रमाणे ती एखाद्या छोटेखानी कार्यक्रमातही शोभून दिसेल. 4 / 7मंडाला साडीचा हा आणखी एक सुंदर प्रकार पाहा.. अशा चमकदार रंगामधल्या साड्या निश्चितच जास्त आकर्षक दिसतात. त्यावर दागिन्यांची निवड जर योग्य पद्धतीने केली गेली तर तुमचा लूक खूप कॅची होऊन जातो.5 / 7अशा पद्धतीच्या सिल्क, सॉफ्ट सिल्क प्रकारातही मंडाला प्रिंट साड्या मिळतात. 6 / 7शिफॉन, जॉर्जेट प्रकारातही मंडाला प्रिंट साड्या मिळतात. त्याही तुम्ही ऑफिसमध्ये तसेच एखाद्या लहानशा समारंभात नेसू शकता. 7 / 7दागिने, ब्लाऊज यांची निवड उत्तम जमून आली तर मंडाला साडी असा सुंदर, रिच लूक देऊ शकते.